Breaking News

नदी डोहाचे पाणी चालंलय चोरीला

नदी डोहाचे पाणी चालंलय चोरीला

मोवाड प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे

मोवाड- एकेक पैसा गोळा करून महापुराने उथळ झालेल्या पाणी टंचाईग्रस्त मोवाड गावातील वर्धा नदीचे खोलीकरण करण्यात आले पाण्याच्या नावावर २८ वर्षा पासुन केवळ राज्यकारणच करण्यात आले.या पाणी टंचाई मुळे मोवाड गावातील शेतीतील उभी फळझाडे वाळायला लागली.या संत्र्याची कँलीफोनिया समजला जाणाऱ्या नरखेड तालुक्यातील मोवाड या गावातील संत्रा बागा वाळायला लागल्या रब्बी पीक उत्पादनवरही विपरित परिणाम व्हायला लागला.नापीकीमुळे आत्महत्या व प्रसंगी गावापलायनाचे प्रमाण वाढले दरवर्षी जमीनीतील पाण्याची पातळी खोल जायला लागली .शेवटी संपूर्ण गाव परिसर रेड झोन मध्ये गणल्या गेले .पाणीटंचाई निवार्णार्थ गावाकऱ्याना शासनाकडे साकडे घातले .त्याचा काही उपयोग झाला नाही .गावात ओढवलेला पाणी टंचाईचा प्रश्न विविध वत्त पत्रानी लावून धरला.परिणामी शासनाने तर हातवर केले मात्र गाकऱ्यानीच पाण्यासाठी आपली कंबर कसली.
मोवाड फाऊंडेशन नावाचे एक संघटन निर्माण करून त्या माध्यामाने गाव वर्गानी करून पैसान पैसा गोळा करून श्रमदानातून तसेच सत्यमेय जयते नरखेड तालुका पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने लगतच्या वर्धानदीचे खोलीकरण करण्यात आले .
या मध्ये मुख्यत्वे बारा डोहाचे खोलीकरण करण्यात आले पावसाळा उशीरा सुरू झाला . मात्र बऱ्याच प्रमाणात पाऊस पण आला .डोह भरले नदी खळखळ वाहू लागली .सध्या फेब्रुवारी महीना संपुष्टात आला.आता नदीची धार जरी वाहने बंद झाले तरी खोलीकरण्याच्या बाराहि डोहात मात्र उन्हाळ्यात पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे.मात्र महीनाभरापासुन लपुन चोरून डोहातील पाणी चोरीला जात आहे.त्यामुळे मोवाडवासी नागरिकांत शासन व लोकप्रशासनाबदल सर्वत्र रोष व्याकत करण्यात येत आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …