तायवाडे महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिषद चर्चासत्राचे आयोजन

कोराडी प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी – स्थानिक तायवाडे महाविद्यालय महादुला कोराडी येथे दिनांक 29.02.20 शनिवारला राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद (विदर्भ प्रांत) नागपूर तायवाडे महाविद्यालय महादुला कोराडी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय राष्ट्रीय चर्संचासत्र परिषद चे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेला कार्यक्रमाचे उद्घाटक भाई जगताप, विधानपरिषद सदस्य मुंबई (महाराष्ट्र) तसेच कार्यक्रमाचे ब्रिजभाषण सुहास पळशीकर, वरिष्ठ राजनीतिक विश्लेषक, पुणे प्रमुख वक्ते अनुराग द्वारी, एन.डी.टी.वी सहसंपादक, व ब्युरो चिफ, भोपाल, (मध्यप्रदेश) देवेंद्र गावंडे, संपादक लोकसत्ता नागपुर, डॉ अलका देशमुख, अध्यक्ष राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद (विदर्भ प्रांत), डॉ शरयू तायवाडे, प्राचार्य तायवाडे महाविद्यालय यांची उपस्थिती राहणार आहे सच्चिदानंद शिक्षण संस्था नागपुर चे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षता मध्ये संपन्न होत आहे. या परिषद मध्ये पूर्ण महाराष्ट्र मधून व बाकी राज्यातुन राजनीति शास्त्र अध्यापक व विश्लेषक सहभागी होणार आहे. या परिषदला पूर्ण दिवस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक विश्लेषण 2019 विषयावर चर्चा होणार आहे तरी आपण सर्व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज