*राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण अंतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम सुरु*
*काही विद्यार्थ्यांना औषधी सेवन केल्याने डोकेदुखी, ताप,उलट्या*
*वेळीच प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर च्या तज्ञानी योग्य उपचार व मार्गदर्शन करुण पालक वर्गाचा गैरसमज केला दुर*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः हत्तीरोग दुरीकरण मोहीम अंतर्गत हत्तीरोग म्हणजे काय…?, तो कशामुळे संक्रमित होतो यावर उपाययोजना म्हणून सामुदायिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत दिनांक 2 मार्च ते 11 मार्च पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून आज दिनांक 2 मार्चला सुभाष प्राथमिक शाळा हिंदी व मराठी येथे जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरी ते पाचवीच्या तीनशे विद्यार्थ्यांना औषधी देण्यात आली*
*त्यात काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ वाटणे,उलटी होणे,ताप येणे,घाम फुटून घाबरल्यासारखे वाटणे यासारखी लक्षणे आढळतच शिक्षक व पालक वर्गात एकच तारांबळ उडाली*
*घडलेला प्रकार लक्षात येताच प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेरचे प्रपाठक डॉक्टर मेश्राम,डॉ. बनसोडे व इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सुभाष शाळेत पोहोचून बाधित विद्यार्थ्यांना लगेच प्रथमोपचार करून हत्तीरोगाचे लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली लक्षणे हत्तीरोग या आजारांचे असू शकतात असे तज्ञांचे मत असून याला घाबरण्याचे मुळीच कारण नसल्याचे डॉक्टर मेश्राम यांनी सांगितले अचानक घडलेल्या प्रकारामुळे पालक पालक वर्गामध्ये काही काळ चिंतेचे वातावरण दिसून येताच प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर व हत्तीरोग दुरीकरण मोहीम जिल्हा एकात्मिक आरोग्य आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चा चमुनी पालक वर्गाच्या मनात असलेली भीती दूर करून त्यांची समजूत घालून समाधान केले*
*याप्रसंगी हत्तीरोग दुरीकरण मोहीम चे नितीन ठाकरे धनराज देवकी प्रवीण मंडपे, निलेश राठोड, प्रकाश धोटे सह अनेक कर्मचारी उपस्थित होते*
*आमचे स्थानिक प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे प्रपाठक डॉ. मेश्राम व डॉ बनसोडे यांनी सांगितले की सदर हत्तीरोग दुरीकरण मोहीम ही शासकीय स्तरावर संपूर्णदेशात राबविण्यात येत असुन सदर औषधी सेवन केल्याने काही प्रमाणात परिजिवीचा नाश होतांना सौम्य प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात त्यात डोकेदुखी,अंगदुखी,ताप,उलटी,तसेच अंगावर पुरळ येणे,खाज येणे असे लक्षणे आढळून येतात.बरेच वेळा हे दुष्परिणाम आपोआपच बरे होतात.फक्त लक्षणानूसार उपचाराची गरज असते आज ही जवळपास दह बारा विद्यार्थ्यांन मधे असे लक्षण आढळून आले व आम्ही त्यांच्यावर योग्य उपचार केला व ते विद्यार्थी आता स्वस्थ आहेत.यात घाबरण्या सारखे काहीच नाही ज्या विद्यार्थ्यांनमधे वरील लक्षणे आढळून आली त्यांची नोंद आम्ही करुम घेतली असून त्यांना संशयित समजून त्यांच्यावर वेळोवेळी तपासणी उपचार केल्या जाईल अशी माहिती देत म्हटले की आज जे घडले ते एक सामान्य बाब असुन विद्यार्थी,पालक वर्ग व आप्त परिवाराने घाबरण्याचे काहीच कारण नाही अशी माहिती दीली*