आज महिलाना जे सन्मानाचे मानाचे स्थांन
प्राप्त झाले आहे .. सरपंच सचिन बोंडे

विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना – आज महिलांना जे सन्मानाचे, मानाचे स्थांन प्राप्त झाले आहे ते केवळ केवळ डॉ *बाबासाहेबां* मुळेच *बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात तशी तरतुद नमूद केलेली आहे.
असे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोडा येथील जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सरपंच सचिन बोंडे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन येथील महीलाना करण्यात आले होते.
या वेळी येथील जागतिक महिला दिन च्या कार्यक्रम माचे अध्यक्ष सरपंच सचिन बोंडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ विद्दाताई पिपळकर ग्रा.प.सदस्या. अंगणवाडी सेविका पुष्पाबाई वरपटकर. राजणीताई बावने. आणी येथील जि.प शाळेचे मुख्याध्यापक दिलिप शेंडे. तसेच गावातील महिला बचत गट आदीची या वेळी उपस्थिती होती .
म्हणूनच आजची महिला हि सर्व क्षेत्रात पुढे आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे आणि यात सिंहाचा मोठा वाटा आहे तो माझ्या माता यशोधरा, माता भिमाई , माता जिजाऊ , माता रमाई , माता सावित्री यांच्या त्यागामुळेच हे शक्य होऊ शकले.*
यांनी जर कष्ट उपसले नसते तर आज आंम्हीसुद्धा कुठेतरी डोक्यावर शेणाच्या टोपल्या उचलत फिरलो असतो.
शिक्षण काय आहे हे आंम्हाला समजलेच नसते. आणि आंम्ही उच्च शिखर गाठू शकलो नसतो. म्हणून आपण यांच्या उपकारांची जाणीव ठेवून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे* आचरणात आणले पाहिजे .असे विविध भाषणादरम्यान येथील महीलानी ही आदी.जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी महीलाना मार्गदर्शन करण्यात आले होते
Maharashtra News Media सच की आवाज