Breaking News

*जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा जागतिक महिला दिन सोहळा संपन्न-*

*जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा जागतिक महिला दिन सोहळा संपन्न-*


*जेष्ठ नागरीकाकडुन. ” कर्तबगार महिलांचा सत्कार “*

*विशेष प्रतिनिधी-  गजानन भोयर काटोल*
जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा दिनांक 8 मार्च, 2020 ला सकाळी 11-30 वाजता पंचवटी काटोल येथील हनुमान मंदीर सभागृहात जागतिक महिला दिन सोहळ्याचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटीका. पं.स.काटोल च्या उपसभापती सौ अनुराधाताई खराडे यांनी सरस्वती माता,सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ला पुष्पमाला अर्पण करून व द्विप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. “खरा तो एकची धर्म ” या साने गुरुजी च्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्रीमती निर्मलाताई कोंडे, प्रमुख अतिथी दंतरोग तज्ञ डाॅक्टर सौ प्राचीताई नागपुरकर, सहा.पोलिस निरीक्षक सौ सोनालीताई जगताप,प्रा सौ स्नेहलताई काकडे, अॅड श्री उपेंद्र खंते या उपस्थिती लाभलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुलाब पुष्प व स्मृतीचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
याशिवाय विविध क्षेत्रात कर्तव्य गाजविण्यार्या, शहीद सैनिकाची धर्मपत्नी श्रीमती रूचिता सोनटक्के, कर्तबगार महिला श्रीमती बुल्लाबाई गीरी,तनिष्का ग्रुप काटोल च्या सौ मेघाताई पाचपोहर, सौ अर्चनाताई बनकर, व श्रीमती संगीताताई चरपे या पाच विशेष महिलांचा गुलाब पुष्प , स्मृती चिन्ह व साडी देवुन त्यांना गौरवण्यात आले.
सौ अनुराधाताई खराडे यांनी उद्घाटनपर भाषणातुन महिलासाठी असलेल्या शासकीय योजनाची माहीती दिली, तर डाॅक्टर सौ प्राचीताई नागपुरकर यांनी महिलांचे प्राचीन व आजचे शिक्षण याबाबत विवेचन केले. सहा.पोलिस निरीक्षक सौ सोनालीताई जगताप यांनी कौटुंबिक हिसांचार टाळण्यासाठी सासु-सुनेने कसे वागावे याबद्दल भाष्य केले. प्रा.सौ स्नेहल काकडे यांनी मुला-मुलींना दोन वर्ग कमी शिकविले तरी चालेल परंतु त्यांच्यावर आई-वडिलांनी चांगले संस्कार करावे,त्यामुळे कुंटुबास-समाजास निश्चितच फायदा होईल. महिलानी सुध्दा दुसर्याच्या समस्या- अडचणी समजुन घेणे महत्वाचे आहे. जेष्ठांच्या अपेक्षा फार जास्त नसतात,त्या पूर्ण करण्याचा मुला-मुलींनी व सुनेने प्रयत्न करावा. असा मोलाचा सल्ला आधुनिक पिढीला दिला. अॅड श्री उपेंद्र खंते यांनी सन 2005 च्या कायद्यातील ,
महिला हिसांचार व त्यांचा हक्क यासंबधाने तरतुदी विषद केल्या.
मंडळाचे अध्यक्ष श्री वामनराव खंडाळ यांनी महिलांनी मंडळाचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी आव्हान केले, जेणेकरून मंडळात जेष्ठ महिला समिती स्थापन करता येईल ,असे प्रतिपादन केले.
मंडळास सहकार्य करणार्या 14 मान्यवरांचा गुलाब पुष्प व स्मृती चिन्ह देउन सत्कार करण्यात आला. तसेच 13 जेष्ठ नागरिकांचा सामुहिक वाढदिवस त्यांना गुलाब पुष्प , पेन व पाॅकेट डायरी सप्रेम भेट देण्यात येवुन साजरा करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातुन श्रीमती निर्मलाताई कोंडे यांनी महिलांनी संघटीत राहावे व जेष्ठ महिलांनी मंडळाचे कार्यात स्वंयप्रेरणेने सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले.
मंडळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांनी प्रास्ताविकातुन जेष्ठ नागरीक मंडळाची आवश्यकता, मंडळाची वाटचाल, शासन धोरण याविषयी विवेचन केले.
तर संचालन तनिष्का ग्रुप च्या प्रमुख डाॅक्टर सौ रंजनाताई कडु यांनी केले. मंडळाचे सहसचिव श्री अशोकराव काकडे यांनी सर्व सन्माननीय मान्यवरांचे ,सहकार्य करणार्यांचे आभार मानले. पसायदानानंतर सर्वांना नास्ता देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
“या कार्यक्रमास बहुसंख्य जेष्ठ महिला व पुरुष उपस्थित होते “

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …