Breaking News

मोवाड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मोवाड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मोवाड विशेष प्रतिनिधि-

स्थानिक मोवाड शहरात नगरपरिषद कार्यालय अंतर्गत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम दिनांक ९ मार्च २०२० रोज सोमवार सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालय मोवाड येथे मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला.

     यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश खसारे, प्रमुख अतिथी  मुख्यधिकारी सिध्दार्थ मेश्राम, नगरसेविका ललिता अकर्ते, शारदा बनाईत, रंजना सोळंके, हर्षलता कडू, वर्षा नासरे, प्रा. अंबाडकर मॅडम, तिजारे मॅडम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शीतल ढोबळे, क्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सीमा बागडे आदि मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात हिरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बेटी बचाओ, बेटी पढाओ यासाठी महिलांकडून स्वाक्षरी उपक्रम राबविण्यात आला  व स्वच्छता विषयक तसेच कोरोना व्हायरस बद्दल विशेष माहिती मान्यवरांनी दिली. जनजागृती प्रभात रॅली काढण्यात आली, व सेल्फ हॅन्ड वॉश, हम समान तो भारत महान, अशा विषयावर मान्यवरांचे व्याख्यान महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वनिता बनाईत संचालन कल्पना निहूल तर आभार सीमा बागडे यांनी मानले या कार्यक्रमाला महिलाचे अथक परिश्रम लाभले, कार्यक्रमाला मोवाड शहरातील  असंख्य महिलांनी सहभाग घेतला आणि मोवाड नगरपरिषद कार्यालयातून प्रभात रॅली काढून विठ्ठल मंदिर येथे कार्यक्रमाचा महिलांना अल्पोआहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.  

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …