Breaking News

*गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांची आमदारकी सर्वोच्च न्यायालयाने ठरविली वैध*

*गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांची आमदारकी सर्वोच्च न्यायालयाने ठरविली वैध*

गडचिरोली प्रतिनिधी – सूरज कुकूडकर

गडचिरोली: गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार डॉ देवराव होळी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने आ.डॉ.होळी यांना दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी डॉ. देवराव होळी हे चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते.निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी शासनाकडे आपल्या वैद्यकीय अधिकारीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु शासनाने डॉ.होळी यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.पुढे डॉ. देवराव होळी भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडूनही आले.परंतु शासनाने न स्वीकारलेला डॉ. होळी यांचा राजीनामा व अन्य मुदृयांवर त्यावेळी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले अॅड.नारायण जांभुळे यांनी डॉ.होळी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. १९ जानेवारी २०१७ रोजी उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देत डॉ.देवराव होळी यांचे सदस्यत्व रद्द केले.त्यानंतर आ.डॉ.होळी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तात्पुर स्थगिती दिली होती. हे प्रकरण तेव्हापासून सर्वोच्च्. न्यायालयात प्रलंबित होते. याच दरम्यान ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेची दुसऱ्यांदा निवडणूक झाली. त्यात डॉ.होळी विजयी झाले. तरीही याचिका प्रलंबितच होती.नुकताच या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविला आहे. डॉ.देवराव होळी यांच्या वतीने अॅड.सत्यपाल जैन, अॅड.गणेश खानझोडे व मनिष शर्मा यांनी काम पाहिले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …