*राज्य स्तरीय कलाहर्ष 2019-20स्पर्धा संपन्न*
*सावनेर शहरातील अनेक विद्यार्थ्यांना मानांकीत स्थान*
*अमर रायकवाड यांना”कलारत्न”तर मोवाडे “कलाभुषन” सन्मान*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
नागपूर ः *महाराष्ट्र शासन, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित “कलाहर्ष – २०१९ / २० राज्यस्तरीय चित्रकला” स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते, त्या अनुषंगाने सावनेर तालुक्यात या स्पर्धेचे केंद्र Abstract Arts Academy सावनेर या कलासंस्थेला दिली असून त्यांनी विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कला उपक्रमाची ही जबाबदारी प्रामाणिकपणे यशस्वीरित्या पार पाडली, त्याचेच फलस्वरुप या क्षेत्रातील विद्यार्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भरघोस बक्षिसे मिळविली.*
*दि.१३ मार्च २०२० रोज शुक्रावरला कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग नागपूर येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात सावनेर तालुक्यातील ई. गटातील राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविणारे Abstract Arts Academy सावनेर ची निधी योगेश लाखानी, भिकुलाल चांडक हायस्कूल केळवद ची पुर्वा प्रदीप सालोडकर, जवाहर हायस्कूल खापा येथील शिवानी नंदकिशोर राऊत, तसेच राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविणारे राष्ट्रीय उच्च प्राथमिक विद्यालय खापा येथील कृतीका रामगोपाल घ्यार, एज्युकेशन पॉइंट पब्लिक स्कूल लोधीखेडा येथील दिगंबर चंद्रशेखर घुगल, तसेच तृतीय क्रमांक मिळविणारे राम गणेश गडकरी पब्लिक स्कूल सावनेर येथील प्रेम ताजने यांनी यश संपादन केले.*
*तसेच जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविणारे सुभाष मराठी प्राथमिक शाळा सावनेर येथील सुहाना जावेद शेख, जवाहर हायस्कूल खापा येथील उत्कर्शा विजेंद्र हीवरकर, ट्विंकल किड्स कॉन्व्हेन्ट सावनेर येथील आयुष संजय मानेकर तसेच द्वितीय क्रमांक मिळविणारे जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा सावनेर येथील पुर्वा सुधाकर डेरकर, पोदार जम्बो किड्स कॉन्व्हेन्ट सावनेर येथील स्वरा मंगेश लांबट, न.प.सुभाष हिंदी प्राथमिक शाळा सावनेर येथील समीर गाफ्फार अन्सारी, तसेच तृतीय क्रमांक मिळविणारे जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा सावनेर येथील दिशिका दिगंबर वाडबुधे ई. विद्यार्थ्यांचा व विद्यार्थ्यांचा कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अथक परिश्रम करून उत्कृष्ट कार्याबद्दल Abstract Arts Academy सावनेर चे कलाशिक्षक अमर रायकवाड यांना “कलारत्न” तर जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा सावनेर येथील मुख्याध्यापक श्री. मोवाडे सर यांना “कलभूषण” पुरस्काराने मां. डॉ. श्री. आशिशजी देशमुख ( माजी आमदार) मा. श्री. शिवलिंगजी पटवे ( शिक्षणाधिकारी), मा. श्री. राजेशजी गवरे ( म.न.पा. आयुक्त), मा.श्री. नरेंद्रजी बराई ( कला महामंडळ अध्यक्ष), मा. श्री. दीपकजी गायकवाड ( कला महामंडळ सचिव), तसेच ई. मान्यवरांचा हस्ते सन्मानित करण्यात आले.*
*कला उपक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वांचा सहकार्याबद्दल Abstract Arts Academy सावनेर चे संचालक श्री. प्रेमदास रायकवाड सर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले..*