Breaking News

*पाच दिवसाचा आठवडा तरी पळसाला पानं तीनच* *अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वेळेचे पालन नाही* *नगर पालिका, तहसील कार्यलाय,उपविभागीय कार्यालय,भुमी अभिलेख कार्यालय सावनेर येथील अधिकांश अधिकारी कर्मचारी 9-45 ला गैरहजर*

*पाच दिवसाचा आठवडा तरी पळसाला पानं तीनच*

*अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वेळेचे पालन नाही*

 

*नगर पालिका, तहसील कार्यलाय,उपविभागीय कार्यालय,भुमी अभिलेख कार्यालय सावनेर येथील अधिकांश अधिकारी कर्मचारी 9-45 ला गैरहजर*

 

*तर प्रत्येक कार्यालयात मोजके कर्मचारी अधिकारी वेळेवर*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*सावनेरः राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देत पाच दिवसीय आठवडा करुण 29 फेब्रुवारी पासुन राज्यात याची अम्मलबजावनी सुरू करण्यात आली*


*पाच दिवसीय आठवडा केल्याने कार्यालयीन वेळा 45 मिनिटांनी वाढविण्यात आले असून सकाळी 9-45 ते सायंकाळी 6-15 अशी असने अपेक्षित आहे.पाच दिवसाचा आठवडा होताच कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत 45 मीनिटांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसारत्यांच्या कर्तव्यास 9-45 ला सुरुवात होऊण घरु जाण्याची वेळा 6-15 करण्यात आली आहे परंतू कार्यालयात आपल्या कर्तव्यावर येण्याच्या वेळेवर बहुतांश कर्मचारी अधिकारी येत नसल्याच्या सुचना सततच्या प्राप्त होत असल्याने आज दि.16 मार्च रोजी महिन्याचा तिसरा सोमवार व सदर नियम लागु झाल्यापासून 17 व्या दिवशी आमचे स्थानिक प्रतिनिधीने सावनेर शहरातील नगर पालिका, तहसील कार्यालय,उपविभागीय कार्यालय व भुमि अभिलेख कार्यालयास भेट देऊण कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची माहिती घेण्याचा व वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सदरहू कार्यालयात एकट दुकट अधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर तर इतर कर्यचारी अधिकार्यांच्या खुर्च्या आपल्या साहेबांच्या प्रतिक्षा करत रिकाम्या असल्याचे निदर्शनास आले*

*नगर पालिका कार्यालय*

*आज दि.16 मार्च ला सकाळी9-45 ला नगर परिषद कार्यालयास भेट दिली असता मुख्याधिकारी कक्ष,लेखा विभाग,आस्थापना विभाग, कर विभाग,पाणी पुरवठा,आरोग्य विभाग,विद्यूत विभाग,शिक्षण वीभाग,सामान्य प्रशासन विभाग,कँशीयर व आवक जावक कक्षांचा फेर-फटका मारला असता मुख्याधिकारी कक्षा सह अनेक विभागातील दारावर कुलुप लागले असुन लेखा विभागात एक लिपिक व शिपाई, बांधकाम विभागातील अभियंता पांडे,सामान्य आस्थापना कक्षात पंकज छेनीया व एक कर्मचारी कँशीयर यांचे कक्षात कँशीयर सह एक कर्मचारी असे मोजके कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर असुन उर्वरित इतर सर्व कर्मचारी,अधिकारी अनुपस्थित असल्याचे चित्र असुन मुख्याधिकारी साहेबांच्या कक्षा सह तर काही कक्षांच्या दारावर चक्क कुलुप लटकल्याचे निदर्शनास आले*

*तर तहसील कार्यालय सावनेर ची स्थिती ही जवळपास याच प्रकारची असल्याची आढळून आली यात तहसीलदार दिपक कारंडे याच्या कक्ष उघडे असून त्यांच्य अनुपस्थिती ची माहिती घेतली असता तहसीलदार हे वेळेच्या आधीच येऊन आपल्या शिपाई व इतर कर्यचिरी यांचे सोबत तालुक्यातील कोच्छी या भ गात कार्यालयीन दौर्यावर रवाना झाल्याची माहिती नायब तहसीलदार जयसींग राठोर यांनी दिली तसेच नैसर्गिक आपत्ती विभाग KGO व AkGO चे कर्यचारी,आवक जावक लिपिक, संजय गांधी निराधार विभागात एक कर्मचारी, उप कोषागार कार्यालय प्रमुख मोरघरे तर WVN नाझर व शिपाई नोंदणी व मुद्रांक विभागातील रजिस्टार व कर्मचारी तसेच शिपाई भारत नांदोरे असे फक्त बोटार मोजता येणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित असुन इतर सर्व कक्षात शुक-शुकाट व खुर्च्या खाली असे चित्र तर वरच्या मजल्यावर स्थित उपविभागिय कार्यालयात कार्यालयाचे बडे बाबू आनंद शेंडे,सामान्य आस्थापना कक्षात विनोद सेंबेकर व शिपाई अनिल भोसले व्यतिरिक्त एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित नसल्याने तालुक्यातीलउपविभागिय अधिकारी कार्यालयाची अशी स्थिती असल्यास इतर कार्यालयाचे काय…? असा यक्ष प्रश्न निर्माण होणे अपेक्षितच…*

 

*भूमी अभिलेख कार्यालय सावनेर*

*सदर कार्यालयात 10-00 च्या दरम्यान भेट दिली असता उप अधिक्षक भूमी अभिलेख यांच्या कक्षाचे दार उघडे म्हणजेच लोटवलेले असुन साहेब आपल्या कक्षात नसून इतर कक्षातील खुर्च्या आपल्या अधिकारी कर्मचार्यांच्या वाट बघत असुन सदर कार्यालयात फक्त मोहम्मद शाकीर,रविंन्द्र आंधळे,जयवंत भगत व युसुफ बेग हे कर्मचारी शिपाई आपल्या साहेबांची वाट बघत असल्याचे दिसून आले*


*शासकीय कर्मचार्यांना शासनाकडून मिळत असलेल्या सर्व सोई सुविधा नंतर ही आपल्या कर्तयाची जान नसणार्या कर्मचारी अधिकारी यांची अशीच लेट लतीफी जर सातत्याने होत असेल तर यावर कठोर उपाययोजना आखने नितांत गरजेचे झाले असुन जे कर्मचारी अधिकारी वेळेवर हजर राहत नाही यांच्यावर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.सदर गंभीर विषयावर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात यावर नागरिकांचे लक्ष वेधले आहे*

*तर सदरहू कार्यालयात आपल्या कार्याकरिता आलेल्या अनेकनागरिकांनी आपले नाव पुढे न येण्याच्या शर्तीवर सांगीतले की हा तर दररोज चाच प्रकार आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …