Breaking News

*सावनेर येथे प्रशासनानी दिलेल्या सुविधांचा गैर फायदा उचलू नका अन्यथा कठोर पाऊल अचलन्यास बाध्य व्हावे लागेल*-तहसीलदार सावनेर

*प्रशासनानी दिलेल्या सुविधांचा गैर फायदा उचलू नका अन्यथा कठोर पाऊल अचलन्यास बाध्य व्हावे लागेल*


(तहसीलदार सावनेर)

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर व दिनेश चौरसीया सावनेर*
सावनेर*कोरोना वायरस च्या प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्रशासन शक्य ते पाऊल उचलून मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून प्राप्त आदेशांची अमलबाजावनी करत आहे याकरिता ठिकठिकाणी नाकेबंदी करुण नागरिकांना घराबाहेर न निघन्याची विनंती करत आहे परंतू तरीही अनेक नागरिक भाजीपाला, किराणा,औषधी व दवाखाने आदिंच्या नावावर घराबाहेर निघुन रस्त्यावर नाहक गर्दी वाढवत आहेत आश्यांवर आता कठोर करवाई करण्यात येणार आहे म्हणून नागरिकांनी अती आवश्यक असल्याच घराच्या बाहेर पडावे अन्यथा आपल्यावर कटु प्रसंग ओढावून कलम 144 नुसार गुन्हे सुध्दा दाखल करण्यात येण्याचा इशारा सावनेर तहसीलदार दिपक कारंडे यांनी दिला*

 

*नागरिकांना वारंवार निवेदनातून विनंती करुण सुध्दा नागरिक रस्त्यावर उतरून आपल्या सोबतच आपल्या परिवाराचा व शहराचा जीव धोक्यात टाकु पाहत असल्याने सोबतच भाजी मंडीत उसळणार्या एकच गर्दी व तेथून कोरोना वायरस च्या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती नागरिकात आता घर करु लागली आहे याकरिता नगर प्रशासनाने आज सायंकाळ पर्यंत जुनी भाजीमंडी पुर्णता बंद करुण तेथील भाजी विक्रेत्यांना बस स्थानक,भाजी मंडी,गोल बाजार,थोक भाजी मंडी,क्रुषी उत्पन्न बाजार समिती अश्या ठीकाणी भाजी मंडीतील दुकानदारांना हलवून दहा दहा फुटाच्या अंतरावर एक दुकान असे चिर ते पाच ठीकाणी शहरात भाजीपाला उपलब्धता करुण देण्याची उपाययोजना करत असल्याने ज्या क्षेत्रातील नागरिक त्याच क्षेत्रातून भाजीपाला सोबतच किराणा व औषधी खरेदी करण्याची सोय केल्यावर नागरिकांनी आपल्याच क्षेत्रातुन खरेदी करावी आपले क्षेत्र सोडून इतरत्र खरेदी करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे व पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी दीला आहे*

*तर काही नागरिकिंनि हलका ताप असल्यास क्रोसीन अथवा आयबोजेसीक प्लस (सर्दी असल्यास) लोओ सेट्रीजीन 5 mg अथवा सेट्रीजीन 10mg (कोरडा खोकला असल्यास) अस्पाकाईंड Dx या औषधी घ्याव्यत व 14 वर्षा खालील नी अर्धी गोळी असा प्राथमिक उपचार घरिच करुण दवाखाण्यातील गर्दी टाळावी अशी विनंती बाह्य रुग्ण विभाग प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे डॉ संदिप गुजर,भुषन सेंबेकर,डॉ बनसोडे आदिंनी केली आहे*

 

*चारशे कीलोमीटर पायी निघाले परप्रांतीय कामगार*

*संचारबंदी मुळे संपूर्ण परिवहन व्यवस्था बंद झाल्या आहेत अश्यात परिवाराचे भरनपोषना करीता कामाच्या शोधात आलेल्या परप्रांतीयांचे ठेकेदारांनी आप आपले काम बंद करुण कामगारांना वार्यावर सोडून दिले कामाच्या ठीकाणी ना कामाची सोय ना खाण्याची व्यवसाय सोबतच राहण्याची ही सोय नाही अश्यात कामगार वर्गा जवळ पालायन करण्या खेरीज दुसरा मार्गच उरला नाही आश्याच बालाघाट जिल्ह्यातील सहा कामगारांची अवस्था झाल्याने त्या जवळपास 400 कीलोमीटर चे अंतर पाई जाण्याच्या निर्धार करुण काटोल तालुक्यातील लाखोली येथे सुरु असलेल्या रेल्वे लाईन च्या बाजच्या नालींच्या काम करत होते काम बंद झाल्यामुळे येथून सहा कामगार पायी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैय्यर तालुका करीता निघाले आहे त्यांची भेट घेऊण महाराष्ट्र न्यूज मीडिया चे मुख्य संपादक किशोर ढुंढेले व समाजसेवी कैलास कामदार यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करुण त्याच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्याकरिता वहानाची सोय करुण देण्याचा प्रयत्न करूण मानवतेचा परिचय देत आहेत*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …