*अवकाळी पावसाचे मुसळदार आगमन*

*रस्त झाले जलमग्न*

*निसर्गाने विषाणू मुक्त केल्याच्या रंगतात चर्चा*
*विशेष प्रतिनिधी विनोद वासाडे पाटनसावंगी*
*सावनेर– केळवद,मंगसा,मानेगाव,टाकळी,पाटणसावंगी सह संपुर्ण तालुक्यात विजेच्या कळकळाटीत अचानक बरसल्या अवकाळी पाऊसाने रस्ते निर्जंतुक झाले असल्याचे चित्र दिसून आले.देशात कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन झाला असून त्याला प्रतिसाद देत नागरिक घरातच थांबले आहे.सध्या मार्च महीना संपण्यात असुन एप्रील महिण्याची सुरुवात होत असून उन्ह हळूहळू कडक होत आहे.घरोघरी पंखे लावणे सुरु झाले असून कुलर लावण्याची तयारी पण दिसून येत आहे.*

*गो कोरोनासाठी व देशाला साथ देण्यासाठी घरी राहून येणारा कंटाळा मनीच दाबून दिवस काढणाऱ्या नागरिकांना सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली व गर्मीतून दिलासा दिला. सुरुवातीला जवळपास अर्धा तास बरसलेल्या मुसळधार पावसाने सम्पूर्ण गावाचे रस्ते सॅनेटाईज केले.शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेल्या गहू हरबरा पिकाचे नुकसान होण्याची भीती या अवकाळी पावसाने निर्माण केली आहे. पाऊस गेल्यावर लगेच काही वेळ सूर्य तेज होऊन कडक उन्ह जरी तापली.तरीही ढगाळ वातावरण व अधुन मधून पावसाच्या सरी पडून रात्रीला ही अश्याच प्रकारचा मुसळधार पाऊस येण्याचे चिन्ह दिसत असल्याने आपल्या शेतात मळ्यात असलेल्या पीकाच्या चिंतेत शेतकरी बंधव हवालदील झाला आहे*
Maharashtra News Media सच की आवाज