राजुरा काँग्रेस पक्षातर्फे गरजूंना किराणा सामानाचे वाटप
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री.सुभाषभाऊ धोटे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा काँग्रेसच्या वतीने लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या गरीब, गरजू, मजुरांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक राव, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एजाज अहमद, शय्यद साबीर, नगरसेवक गजानन भटारकर, हेमंत झाडे,राकेश वरवाडे, साहिल बोरसरे, राहुल रेकलवार,आकाश मावलीकर,शाहिद शेख, इरफान, शहनवाज कुरेशी, केतन पाचभाई यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.