भुकेल्या मजुरांच्या मदतीला धावून आले शिवसैनिक*
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: लॉकडाऊनमुळे गडचिरोलीत अडकलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील १० मजूर कुटुंबीयांना शिवसेना नेते अरविंद कात्रटवार यांच्या पुढकाराने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सोबतच मजुरांच्या दैनंदिन भोजनाची व्यवस्थाही शिवसैनिकांनी केल्याने त्यांचा भुकेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील १० कुटुंब गडचिरोली जिल्ह्यात रोजगारासाठी आले होते. परंतु लॉकडाऊनमुळे ते आपल्या स्वगावी जाऊ शकले नाही. अशातच रोजगाराअभावी पैसे नसल्याने त्यांची आबाळ होत होती. त्यामुळे या कुटुंबीयांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांचे कार्यालय गाठून आपबिती सांगितली. श्री.कात्रटवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मजुरांचे वसतिस्थान गाठून दैनंदिन जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले. शिवाय स्वखर्चाने शिवभोजन केंद्रात सर्वाच्या दैनंदिन भोजनाची व्यवस्थाही केली. या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, योगेश कुड़वे, संजय बोबाटे, नीळकंठ मेश्राम, अमोल मेश्राम, संजय चाग, संतोष गेडाम आदी शिवसैनिक उपस्थित होते