Breaking News

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली कुरखेड्यातील कोरोनाविषयक व्यवस्थेची पाहणी

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली कुरखेड्यातील कोरोनाविषयक व्यवस्थेची पाहणी

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

कुरखेडा: जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज कुरखेडा तालुक्यातील विविध ठिकाणांना भेटी देऊन प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या कोरोनाविषयक व्यवस्थेची पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी कुरखेडा येथील उप जिल्हा रूग्णालय, स्थलांतरीत लोकांसाठी तयार केलेला रीलीफ कॅम्प व क्वारंटाईन वॉर्ड या ठिकाणांची पाहणी केली. कुरखेडा येथे वेगवेगळया ठिकाणी तयार केलेल्या रीलीफ कॅम्पमध्ये १५७ लोकांचा समावेश आहे. यामध्ये परराज्यातील ६६, इतर जिल्हयातील ७०, जिल्हयातील वेगवेगळया तालुक्यातील ५, तर गोरगरीब गरजू १६ लोकांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रशासनाबरोबर विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती तसेच सीएसआर मार्फत मदत देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी कॅम्पमधील लोकांशी संवाद साधला. या भेटी दरम्यान कुरखेडा तहसीलदार सोमनाथ माळी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक व महसूल अधिकारी उपस्थित होते.

या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्गाबाबत तयार करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षास भेट दिली. त्या ठिकाणी बेड, शौचालय सुविधा, पाणी व्यवस्था व इतर अनुशंगिक व्यवस्थांबाबत पाहणी केली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …