*प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थाची आन्तर्राज्यीय तस्करी करत असलेले10 आरोपी गजाआड*

*सावनेर येथील होमगार्ड पथकातील सैनिकाचा समावेश*
*8 लाख 16 हजाराचा ऐवज जप्त*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर–महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करतांना 10 आरोपींच्या मुसक्या आवरण्यात पोलीसांना यश मिळाले असुन सदर आरोपीत सावनेर होमगार्ड पथकातील एक शिपाई ही शामील.राज्यात सुगंधित तंबाकू गुटक्यावर बिक्रीची बंदी असुनही नजिकचे राज्य मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात या साहित्याचे महाराष्ट्र राज्यात अवैध रुपाने तस्करी निरंतरतेनी होत आहे. राज्यात या सुगंधित तंबाकू व गुटख्याला मोठी मागणी असून अव्वाच्या सव्वाची किमतीत विकल्या जाते.सदर अवैध व्यवसाय जिल्ह्यात राजरोसपणे सुरु आहे .या व्यवसायात नागपुर शहर व ग्रामीण चे कई तस्कर लिप्त आहेत.सद्या कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राज्याच्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे सदर तस्कर चोर रास्त्यांचा उपयोग करूण सुगंधित तंबाकू व गुटखा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आणत आहेत*

*भोपाळ मार्गावरिल खुर्सापार येथील चेक पोस्टवर मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन्हीही राज्याचे पुलिसा व्दारा नाकाबंदी केल्याने तंबाखूजन्य गुटखा व दारू आंतरराज्यीय तस्करी करीता साईखेड़ा-सावली या मार्गाचा उपयोग करत आहे.या मार्गने तंबाखू जन्य प्रतिबंधित साहित्याची तस्करी होत असल्याची सुचना प्राप्त होताच केळवद पुलिस व्दारे नाकाबंदी करुण मंगलवार ला सकाळी 8:00 च्या दरम्यान केळवद ठाण्याच्या पथकास काही वाहन या मार्गने येत आसल्याचे दिसताच त्यांची चौकशी केली असता आरोपिं जवळून 8,16,728-00 रूपयाचा गुटखा,सुगंधित तंबाकू व अन्य साहित्य जप्त केले आहे यात एक तवेरा क्र.एमएच27 बीवी 0638,मोटरसाईकिल क्र.एमएच31 बीजी 4868,एमपी28 एमआर 7615,एमएच31 डीक्यू 7637 व एक राज्य परिवहन कार्यालयाच्या बिनपरवाना वाहन एक्टिवा चा समावेश आहे. कार्रवाईत पुलिसांनी आरोपी रूपेश हरिहर बावनकर (वय 23 ),चेतन राजेन्द्र वंजारी (वय 23 रा. नांदागोमुख,)गजानन शंकर मानकर (वय 34 डोरली,भिंगारे),रोशन रवीन्द्र गुमड़े (वय 26 रा.पार्डी- देशमुख),चंद्रशेखर हेमराज बासोटिया (वय.44 रा. पहलेपार,सावनेर),नरेन्द्र मुरलीधर शेंडे (वय.39 सावली),सचिन दशरथ भूते (वय.29 निवासी तिनखेड़ा मप्र),राहुल राजू चचाने (वय.18)तिनखेड़ा मप्र,अंशुल इंकाप्रसाद कटरे (वय.20 रा. सावनेर),दीपक भानूदास कडू (वय.38 रा.नीळगांव) सोबतच सदर प्रतिबंधित मालाची आपूर्ति करणार्या वडचिचोली येथील किराणा दुकानदार व सावनेर शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखे ची विक्री करणार्या एक आरोपी वरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे*

*सावनेर होमगार्ड पथकचा सिपाई सदर तांबाखूजन्य पदार्थाच्या तस्करीत जेरबंद आरोपित चंद्रशेखर हेमराज बासोटिया हा सावनेर येथील होमगार्ड पथकात कार्यरत आहे*
*यापुर्वीही त्यास एका हत्याच्या घटनेत जमावास भडकवीन्याच्या आरोपात विभागीय चौकशी करुण काहीकळा करीता निलंबित करण्यात आले होते त्यानंतर त्यांने पोलीसांशी असलेल्या जवळीक चा लाभ उचलन्याकरिता अश्या अवैध मार्गाचा अवलंब केला आहे.होगगार्ड सैनिक आपल्या गणवेशाच्या आड़ प्रतिबंधित वस्तुंची तस्करी करुण होमगार्ड पथकाची विश्वसनियता पणाला लावणार्या हदर आरोपीस बडतर्फ करण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.*
*सदर कार्रवाईत केळवद पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेश मट्टामी,एपीआई पंकज वाघोड़े,अरूण गुंथे,रवीन्द्र चटप,रवीन्द्र डोरले,राजेन्द्र रेवतकर,सचिन येलकर,देवा देवकाते,गुणवंता डाखोळे आदिनी भाग घेतला*
Maharashtra News Media सच की आवाज