*युवक कॉंग्रेसतर्फे पाटणसावंगीत रक्तदान शिबिर*
*102 दानदात्यांनी रक्त दान करुन दिला देशप्रेमाचा परिचय*
*विशेष प्रतिनिधी विनोद वासाडे सोबत अक्षय चिकटे पाटनसावंगी*
पाटनसावंगी –सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक निशांत फुलेकर आणि यांचे सहकारी कुणाल कवडे, कृष्णा जूनघरे यांनी सुध्दा रक्तदान केले,यात काँग्रेस कार्यकर्त्यासह ग्रामस्थांचा सहभाग होता. देशात कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्तिथी निर्माण झाली आहे.त्यामुळे अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले.*
*त्यानुसार मंगळवारी पाटणसावंगी येथील ग्रामपंचायत भवन मध्ये आयुष रक्तपेढीच्या सहकार्यने हे शिबिर झाले.रक्तदान करण्याऱ्या रक्तदात्यांना युवक काँग्रेसच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार ही करण्यात आला*
*याप्रसंगी नागपूर जिल्ह्या युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सीरिया, सरपंच अजय केदार, सतीश केदार, अक्षय चिकटे यांच्यासह आयुष रक्तपेढीचे चमू उपस्थित होते.