*जिल्हा अधीक्षक,कृषी अधिकारी यांना तारीख वाढविण्यासाठी नीवेदन*

*कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या जाहिरातीतील तारीख वाढविण्याबाबत व ऑफलाईन अर्ज स्विकरण्याची वीनंती*
*विशेष प्रतिनिधी नागपूर*
नागपूर जिह्यातील इच्छुक शेतकरी बांधवांना सन २०२०- २१ या वर्षासाठी कृषी विभागाच्या वतीने विविध योजना चा लाभ घेण्या करिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांच्या अंतर्गत येणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत अर्ज मागविण्यात येत आहे.तरी इच्छुक शेतकरी बांधवांनी खाली दिलेल्या कृषी विभागाच्या विविध योजना विषयक माहिती जाणून घेऊन दि.२०/ एप्रील/२०२० पर्यंत खालील फॉर्म सबमिट करावा.अश्या प्रकारची बातमी आपल्या कृषी विभागाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली आहे.या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या लभाबद्दल आपण योजलेल्या योजनेबद्दल आपले अभिनंदन.
पण सध्या सुरू असलेल्या या लॉक डाऊन आणि संपूर्ण देश भाऱ्यात संचार बंदी सुरू असताना आमचे शेतकरी बंधू हा फॉर्म भरून कसा काय सबमिट करू शकणार आहे.ही विचाराची बाब आहे.सदर फॉर्म ऑनलाईन सबमिट करायचा असला तरी वस्तू स्थिती अशी आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्या कडे अँड्रॉइड फोन नाहीत.काही शेतकरी बांधव ऑनलाईन फॉर्म भरण्या इतके सुशिक्षित सुधा नाही.त्यांच्या कडे नेट कॅफे मध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.अश्या परिस्थितीत गरजू शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणे कसे काय शक्य होणार चिंतेची बाब आहे.त्या स्तव मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आपणास विनंती पूर्वक सदर विषयाचे गांभीर्य ओळखून आपण नियोजित केलेली २०/ए प्रिल/२०२० ही तारिक न ठेवता हा महामारीचा काळ संपल्या नंतर किमान दोन महिने किव्हा त्याहून अधिक वेळ सर्व शेतकरी बांधवांना देण्यात यावा.त्याच प्रमाणे ऑफलाईन अर्ज सुधा स्वीकारण्यात यावे .जेणे करून शेतकरी बांधवांना अर्ज भरणे आणि योजनेचा लाभ मिळणे सोईस्कर होईल. माननीय महोदय मला असे वाटते की सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेतल्यास कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील,संचार बंदीचे उल्लंघन होणार नाही कोरोना सारख्या जीवाणूंचा प्रसार होणार नाही.
मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेब सदर विषयाचे गांभीर्य ओळखून आणि शेतकरी बांधवांची गरज ओळखून मा.कृषी अधिकारी, मा.तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी वर्गास आपल्या मार्फत काढण्यात आलेल्या पत्रकात सुधारणा करून सुधारित पत्रक प्रसिद्धीस देण्याचे कळवावे अशी विनंती सदर निवेदनातून करण्यात आली असुन मा.राजसाहेब ठाकरे – अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना,मुंबई,मा.योगेशजी परूळेकर–अध्यक्ष – रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना,मुंबई,मा. योगेश जी चिले – सर चिटणीस – रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना,मुंबई यांना मिहितीस्तव रवाना करण्यात आल्याची माहीती जिल्हा संघटक सुनील ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रातुन दिली आहे
Maharashtra News Media सच की आवाज