*डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच साजरी करा*

*खापरखेडा पोलीसांनी बोलावली शांतता कमेटीची सभा*

*प्रत्येक बौध्द विहाराचे प्रतिष्ठीक नागरीकांची हजेरी*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेडा:- देशासह नागपूरातील कोरोनाचा प्नकोप टाऴण्यासाठी देशहिताच्या टृष्टीने यंदा डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंत्ती घरातच साजरी करा आणि देशहितासाठी गर्दी टाऴा असे आवाहन खापरखेडा पोलिस स्टेशनचा शांतता समितीचा आढावा बैठकीत पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार व वरिष्ठ पोलिस निरीक्षक चद्रकांत काऴे यांनी केले
डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंत्तीच्या पार्श्र्वभूमीवर आज खापरखेडा पोलिस स्टेशन येथे पोलिस उपविभागिय अधिकारी संजय पुज्जलवार व पोलिस निरिक्षक चद्रकांत काऴे यांच्या मार्गदर्शनांत आज शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती त्या बैठकीत खापरखेडा येथिल सर्व बौध्द विहार चा पदाधिकारी यांना बोलविण्यात आले होते त्या वेऴी पुज्जलवार यांनी सांगितले दर वर्षी १४ एप्निल ला शहरातील बौध्द विहारांत ठिक ठिकाणी मिरवणूकीसह कार्यक्रम व उपक्रम होतात यंदा असे कार्यक्रम न घेता महामानवास घरूनच अभिवादन करावे व पुष्पहार अर्पण करावे कोरोनाबाबातच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे सध्या राज्यात कलम १४४ लागु असुन पोलिस विभागाकडून १३ व १४ एप्निल रोजी डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंत्ती च्या कोणत्याही कार्यक्रमास परवागी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले तर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणा-यांवर पोलिसांकडून कार्यवाही होणार बौध्द बांधवानी पोलिसांना सहकार्य करावे तसेच सोशल डिस्टिंग चा प्रादुर्भाव सुध्दा खापरखेडा पोलीस स्टेशनाला पाहायला मिळाला व पोलीस बांधव आपलाआपला जिव मुठीत घेऊन रात्र न दिवस काम करत आहे म्हणून त्यांचासाठी सँनीटायझर व्हँन तयार करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी ग्राम पंचायत चिचोली संरपच पुरूषोत्तम चांदेकर, पृथ्वीराज बोरकर, अजय सहारे रेवा वासनिक, रवि शेंडे, राजु शेंन्डे, बबन वासनिक, पकंज गजभिये, संजय डहाट, प्रकाश लाजेवार, बागडे आदी बौध बांधव उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज