Breaking News

*रक्तदानाचे महत्व संकट आल्यावर कळते.… स्वेच्छा रक्तदानाचा १२ वा दिवस आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम

*रक्तदानाचे महत्व संकट आल्यावर कळते.…

स्वेच्छा रक्तदानाचा १२ वा दिवस आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम

विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना :- भाजप सोशल मीडियाच्या चमुने केले रक्तदान*
मानवाची उत्पत्ती होताना निसर्गाने भेद केला नाही,म्हणून प्रत्येकाचं रक्त लाल आहे.रक्तदान मुळे सामाजिक दायित्वाची जडण-घडण होते. कोरोनाचे संकट मोठे आहे,त्यामूळे समाजाच्या प्रत्येक घटकाने रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे ,असे प्रतिपादन चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ चे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी केले.ते आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे आय एम ए सभागृहात आयोजित स्वेच्छा रक्तदान कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर राहुल पावडे,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, रवी आसवांनी,संदीप आवारी, प्रमोद शास्त्रकार,प्रदीप किरमे,सुरेश गोलेवार,आय एम ए उपाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,दत्तप्रसंन्न महादानी,डॉ झेबा निसार,नारायण पोतरंगे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
तुमराम म्हणाले,कोरोना महामारी पासून स्वतःला व परिवाराला सुरक्षित ठेवून समाजोपयोगी कार्य करणे ही काळजी गरज आहे.रक्तदानाच्या माध्यमातून एक गरज पूर्ण होताना आम सुधीर मुनगंटीवार यांचे चौफेर कार्य कौतुकास्पदच आहे.
यावेळी,प्रास्ताविकात दत्तप्रसंन्न महादानी यांनी या उपक्रमाची माहिती देत हे रक्त विशेषत्वाने जिल्ह्यातील सिकलसेल व थायलेसेमिया च्या रुग्णांना दिले जात असल्याचे सांगितले. लॉक डाउनमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला व आम मुनगंटीवार यांनी सूचना केल्या प्रमाणे त्यांच्या मित्र परिवाराने हा उपक्रम हाती घेतला,अशी माहिती त्यानी दिली.
आज रक्तदानाच्या ( १३ एप्रिल ) १२ व्या दिवशी महानगर भाजपा सोशल मीडियाच्या चमुने रक्तदान केले,ज्यात राहुल लांजेवार,स्वरूप लांजेकर,अतुल हेमके,मोनेश बघेले,गौरव राजूरकर या युवकांचा समावेश होता.
आता पर्यंत ६३ लोकांनी स्वयंस्फुर्त रक्तदान केले असून लॉक डाउन असे पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे. उद्या मंगळवार ( १४ एप्रिल ) ला भाजपा दलित आघाडीचे युवा रक्तदान करतील अशी माहिती डॉ गुलवाडे यांनी संचालन करताना दिली.प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी भाजपा सोशल मीडियातील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …