इंजिनीअर व परिवाराकडून पोलिसांना बेदम मारहाण,बॅटने फोडले डोके. गडचांदूर येथील घटना,क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याचे कारण,उपचारासाठी रेफर-टु चंद्रपूर.

इंजिनीअर व परिवाराकडून पोलिसांना बेदम मारहाण,बॅटने फोडले डोके.


गडचांदूर येथील घटना,क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याचे कारण,उपचारासाठी रेफर-टु चंद्रपूर.

विशेष प्रतिनिधी- गौतम धोटे

कोरपना“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.घरातच रहा,बाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करून ही नागरिक जुमानत नसल्याचे चित्र कित्येक ठिकाणी पहायला मिळत आहे.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस 24 तास जीवाचे रान करताना दिसत आहे.याच श्रेणीत 19 एप्रिल रोजी दुपारी अंदाजे 12 च्या सुमारास गडचांदूर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना स्थानिक सरण सॉ मिल समोरील मैदानावर काही युवक क्रिकेट खेळताना दिसले.त्यांना सध्याच्या परिस्थिती बद्दलची जाणीव करून देत घरी जाण्यास सांगितले असता त्यातील एका इंजिनीअर व त्याच्या परिवाराने अश्लील भाषेचा वापर करत वाद घालायला सुरुवात केली.इतक्यात क्रिकेट खेळणाऱ्या इंजिनीअर अविनाश चव्हाणने कॉन्स्टेबल तिरुपती मानेच्या डोक्यावर बॅटने वार केला.त्यात माने गंभीर जखमी झाला तर रोहित चिलगिरे याला स्टैंपने मारहाण करण्यात आली आहे.जखमी पोलिसांना अगोदर गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.इंजिनिअर अविनाश हा शासकिय सेवेत कार्यरत असल्याचे कळते तर त्याचे वडील वनसडी जि.प.शाळेत मुख्याध्यापक पदी कार्यरत आहे.आरोपी अविनाश व त्याच्या सहकार्‍यांना अटक करण्यात आली असून वृत्तलिहीत्सव गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिसांना जर मारहाण करण्यास लोक धजावत असेल तर सर्वसामान्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.काही दिवसापुर्वी नांदा येथे एका पत्रकाराची कॉलर धरून मारहाणीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती.मात्र पोलिसांनी NC दाखल केली.योग्यवेळी कारवाई झाली नसल्याने आजही तो पत्रकार दहशतीत वावरत असल्याचे पहायला मिळत आहे.अशामुळेच सदर घटनांना बळ मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …