*कोविड़ 19 ची ही राजधानी व उपराजधानी*
*मुंबई नागपुरात वाढती रुग्णांची संख्या चिंतेचा विषय*
*जिल्ह्याची झड़ तालुक्यांना पडण्याची भीती*
*रेड झोन घोषित नागपूर शहरातून फळभाज्या,कीराणा परिवहन व कर्मचार्यांचे आवागमनामुळे मोठा धोका होण्याची शक्यता*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*
*राज्याची राजधानी व उपराजधानी ला कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाने इतके जबरदस्त झपाटले की चक्क “कोवीड़ 19” ची ही राजधानी व उपराजधानी बनलेले मुंबई व नागपूर शहरात दररोज सातत्याने नवीन रुग्णांची भर पडत असून “रेड झोन”घोषित झाले आहे*
*शासकीय स्तरावर अनेक उपाययोजना करुण ही राज्य व स्थानिक प्रशासनास वाढत्या रुग्णांच्या आकडेवारी कमी करण्यात यश मीळत नसल्याने आता धकला-धकलीचे राजकारणाला ही सुरूवात झाली आहे याचे उदाहरण उपराजधानी नागपूर येथे बघावयास मीळत आहे.ही वेळ आरोप प्रत्यारोपणाची नसुन कठोर कु्तीची आहे.अनेक उपाययोजना आखून जर यश मीळत नसेल तर काही युक्तींवर सुध्दा विचार करावा लागणार. त्याकरिता हेवे दावे विसरून स्थानिक व पोलीस प्रशासनाला काही सक्तीचे पाऊल ही उचलावी लागतील*
*अचानक वाढलेली संख्या यावर विचारपूर्वक ठोस पाऊले उचलून जवळपासचे जिल्हे राज्यातुन होणारी मोठी परीवहन,सातत्याने जिल्हा मुख्यालयातुन इतरत्र कर्तव्यावर निघनारे थवे,अवैध रुपाने व आडमार्गाने होणारे परिवहन, फळभाज्या मंडीत उसळणारी गर्दी आदी सहज दिसणारे विषय ही गंभीर होऊ शकतात.*
*जिल्ह्याची झड़ तालुक्यात पोहचण्याची शक्यता*
*नागपूर शहरात दररोज नव्याने कोरोना पाँजेटिव्ह रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय असुन “रेड झोन” घोषित क्षेत्रातुन तालुका स्तरावर होत असलेले सदोष परिवहन कोणत्या विषम परिस्थितीला तर आमंत्रण देत नाही ना…? असा सवाल आता तालुक्यातील नगरिकांना सतावू लागला आहे याला कारण ही आहे ते म्हणजे जिल्ह्यातील कामठी,कन्हान,वाडी परिसरात ही कोरोना वायरस च्या प्रादुर्भावाने ग्रसीत रुग्ण आढळून येत असल्याची धक्कादायक बाब पुढे येत असल्याने नागरिकांच्या भीतीत वाढ होने अपेक्षितच.*
*नागपूर जिल्हा ग्रामीण मधे भीतीच्या वातावरणाचे मुख्य कारण म्हणजे रेड झोन घोषीत नागपूर शहरातून तालुका स्तरावर राजरोसपणे पोहचणार्या जिवनावश्यक किराना,दुध,औषधी व शेती उपयोगी औषधी,फळभाज्यांची परिवहन करणारे शेकडो वाहने,दररोज शेकडोच्या वर अवागमन करणारज शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी,जे नागपूर शहरातील विविध भागातून ग्रामीण भागात पोहचून ग्रामीण भागात कोरोना वायरस प्रादुर्भाव पसविण्याकरिता पोषक वातावरण निर्मिती करु शकतात*
*तर राहलेली कसर रस्त्यावर लागणारे फळभाज्यांचे शेकड़ हात ठेल्याची गर्दी सोबतच त्या ठेल्यावर उसळणारी ग्राहकांची गर्दी स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या चार तासाच्या अवधीला आंबा दाखवून तास भर आधी तर तास भर नंतर अशी सहा तास रस्त्यावर गर्दी वाढवून लाँकडाऊन ची धींड काढत नगर प्रशासन व पोलीस प्रशासाच्या हातवर तूरीच्या अक्षदा ठेवत आहे.व जे नागरिक शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करुण स्वतः व परिवायाची काळजी घेत सहकर्यांच्या भुमिकेत आहेत त्यांचा रक्तदाब वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत*
*वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चालढकल प्रणाली मुळे रस्त्यावर गर्दी उसळत असल्याचे नागरिकांचे मत असुन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दिशानिर्देश नुसार प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी हजर राहणे गरजे असुन सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो कर्मचारी दररोज रेड झोन ठरलेल्या नागपूर शहरातून ये जा करत आहे हे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात का येत नाही अथवा जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात हे कळायला जागाच उरली नाही.की याला कुणाची मुक परवानगी तर नाही ना*
*नागपूर जिल्ह्यातील इतर तालुक्या प्रमाणेच सावनेर तालुक्यातील सावनेर शहरात दररोज लाँकडाऊन ला झुगारून रस्त्यावर उतरणारी गर्दी व रेड झोन घोषीत शहरातून होणारी फळभाज्या व इतर परिवहना सह नागपूर शहरातील विविध भागातून येत असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना मुख्यालयी याहण्याची सक्ती अथवा लाँकडाऊन सुरु असे पर्यत बिन पगारी रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे*