आवारपूर/कवठाळा भागात जंतुनाशक फवारणी
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :-कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत यामध्ये येथील विरूर(कवठाळा ग्रामीण दवाखान्याच्या वतीने सामाजिक दायित्व जोपासत आहे,येथील भागातील
इरई ,बोरगाव ,गाडेगाव, नांदगाव, नवेगाव, बाखडी ,लखमापूर, कवठाळा, सोनुलीँ आदी ग्रामीण भागातील जंतुनाशक औषदाची फवारणी केली आहे
ग्रामीण दवाखाना विरूर कवठाळा येथील डॉ रमेश बावने यांच्या नेतृत्वाखाली आवारपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात अंगणवाडी, डॉ आंबेडकर नगरातील तसेच गावातील नाल्या आदिसह
बसस्थानक सेडच्या आदीच भागातील जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली होती, आणी डॉ रमेश बावने यांनी स्थानिकांना या जिवघेण्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले ,यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आणि वेळोवेळी हात धुऊन स्वच्छता ठेवणण्याचे आवश्यकता असल्याचे सांगितले.