*दिव्या खालचा आंधार*

*मुख्याधिकारी निवासस्थानी राहतात काटेरी झाडे झुडुपे*

*लाखोच्या निधीचा अपव्ययाची जबाबदारी कुणाची*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर- सावनेर नगर परिषदेच्या तत्कालीन नगर प्रशासनाने “प्रशासकीय मुख्याधिकारी” यांच्या मुख्यालयी राहण्याकरिता सर्व सुविधायूक्त असज एक सुसज्ज असे “मुख्याधिकारी निवास स्थान” छिंदवाडा रोज लागत असलेल्या पोस्ट आँफीस व नेहा नर्सिंग होम या दोन इमारतीच्या मधे असलेल्या नगर परिषदेचे मालकीच्या जागेवर निर्माण करण्याकरिता लाख़ो रुपये खर्च करण्यात आले होते पंरतु हयात स्थितीत सदर निवास स्थानाचा फेरफटका मारला असता नगर प्रशासनाने मुख्याधिकारी यांच्या वास्तव्य करिता उभारण्यात आलेला हा लाखोचा निधी वाया जात आहज अथवा वाया गेले असे म्हटले तर वागवे ठरणार नाही*

*निवास स्थानाचा उद्देश मुख्याधिकारींनी मुख्यालयी रहावे*
*प्रत्येक नगर पालीकेच्या प्रगती मधे स्थानिक नगर प्रशासन व प्रशासकीय मुख्याधिकारी यांचा सिंहाचा वाटा असतो जनप्रतिनिधी जरी ही आपल्या आपसी राजकरणात सत्तापक्ष व विपक्षाच्या भुमिकेत आमोरासामोर येत असतील तर त्यातील मुख्य दुआ हा मुख्याधिकारी असतो सोबतच नगर पालीकेच्या सर्व अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांचे योग्य नियोजन व मार्गदर्शन करुण नगरवासीयाँना सोई सुविधा उपलब्ध करुण देण्याचे मुख्य दाईत्व मुख्याधिकारी यांचेच कार्यक्षेत्रात येते व मुख्याधिकारी मुख्यालयी वास्तवास असले की कर्मचाऱ्यांवर त्यांचे दडपण व भीती निर्माण असते व ते आपल्या कर्तव्यावर कामचुकार पणा करण्याकरिता विचार करता तर जनप्रतिनिधींना तसेच नगरिवर ओढावलेल्या आकस्मिक घटनेत महत्वाचे निर्णय घेण्याह सोईचे होते म्हणूनच शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्तीच नव्हे तर तसे आदेश पारीत आहे*

*इतके सर्व असुनही अनेक अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नसुन नजिकच्या महानगरातून आपल्या कर्तव्यावर आवागमन करत असल्याचे स्पष्ट चित्र आहे परंतू “तेरी भी चुप,मेरी भी चुप” च्या आड़ सब चलता है,कोणी लक्ष देत नाही,दिले तर बोलत नाही, बोलले तर कुणी आईकत नाही,आईकले तर उपाययोजना होत नाही म्हणून हे सर्व राजरोस सुरु असतं.जेव्हा मुख्याधिकारीच मुख्यालयी राहत नाही तर कर्मचारी कोठून राहणार व कर्मचार्यांवर काय आदर्श प्रस्तुत करणार*

*मुख्यालयी न रहाता राहणे दर्शवीने*
*असे नाही की मुख्याधिकारी अथवा शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नाही नक्कीच राहतात ते फक्त कागदोपत्री शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याकरीता नगरीत एखादे मकान घर भाडे तत्वावर घेऊन मुख्यालयी राहण्याचे दर्शवून सर्यासपने आवागमन करतात अश्यामुळे नगरीतील सेवाकार्य प्रभावित तर होतातच सोबतच नगर प्रशासनाच्या तीजोरीवर आर्थिकदृष्ट्या भुर्दंड ही बसतो*
*लाखोचा निधी उधडून मुख्याधिकारी साहेबांच्या वास्तव्याकरिता बांधन्यात आलेल्या निवासस्थानाच्या योग्य डागडुजी करुण मुख्याधिकारी यानी या निवासस्थानी वास्तव्य करावे मुख्यालयी न राहता राहण्याचा देखावा करणारे अधिकारी/कर्मचार्याची योग्य चौकशी करुण त्यांचजवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनसामान्यांतुन होत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज