Breaking News

*इम्पॅक्ट* -*बातमी प्रकाशित होताच हादरले प्रशासन* *महाराष्ट्र न्यूज मीडिया ने उघडकीस आनला होता नगर प्रशासनाचा सावळागोंधळ* *बातमी प्रकाशित होताच प्रशासनास आला जाग मागील अनेक वर्षांपासून कोर्या नंबर प्लेट आकडे टाकून दिली ओळख*

*इम्पॅक्ट*
*बातमी प्रकाशित होताच हादरले प्रशासन*

*महाराष्ट्र न्यूज मीडिया ने उघडकीस आनला होता नगर प्रशासनाचा सावळागोंधळ*


*बातमी प्रकाशित होताच प्रशासनास आला जाग मागील अनेक वर्षांपासून कोर्या नंबर प्लेट आकडे टाकून दिली ओळख*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेर- महाराष्ट्र न्यूज मीडिया वर “सावनेर शहरातील गल्ली बोळी व रस्त्यावर भरधाव धावतात बिन क्रमांचे यमदुत” या मथड्या खली प्रखरतेने बातम्या प्रकाशीत होताच मुख्याधिकारी सह नगर प्रशासनाची सर्वत्र किरकीरी होऊ लागली व सदर विषयाचे गांर्भीर्य ही तीतकेच गंभीर व परिणाम तर एखाद्याच्या जिवीतेचे प्रश्न अश्या अती महत्वाच्या प्रश्नावर मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे मौन का…?नगरीतील नागरिकांच्या जिवीतेच्या प्रश्नाला घरुण अचानक बातम्या प्रकाशित झाल्याने मुख्याधिकारी महोदयासह संबधीत विभाग खळबडून जागे झाले व नगरितील घनकचरा उचल करणाऱ्या सदर वाहनांवर आखेर क्रमांक अंकीत करण्यात आले*

*मुख्याधिकारी व संबधीत विभागाने दक्षते पुर्व आपल्या कर्तव्याशी न्याय केल्यास आपल्या विभागाची जनसामान्यांत होणारी किरकीरी टाळू शकले असते परंतू जेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आपल्या अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहणार नाही तेथे असे प्रकार तर घडणारच या आधी शहरातील घनकचरा उचल करणार्या वाहनांचे कीरकोळ अपधात घडल्यास वाहनांवर क्रमांक नसल्यामुळे एकमेकांवर धकलाधकलीचे प्रकार घडत असे परंतू आता वाहनांच्या नंबर प्लेटवर क्रमांक अंकित केल्याने त्यांची ओळख पटवून त्या वाहन चालकावर कारवाई करण्यात सोईचे जाईल असे नागरिकांचे मत आहे*


*अंकीत केलेल्या नंबर प्लेट ओबडधोबड*

*सावनेर नगर परिषदचे बिना नंबर प्लेट चे वाहने रस्त्यावर धावत असल्याचे वु्त्त प्रकाशित होताच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व संबंधीत विभागाने वाहनांच्या नंबर प्लेट वर वाहनांचे क्रमांक अंकीत करण्यात मोठीच घाई करत मनमर्जी ने नंबर प्लेटा रंगवून राज्य परिवहन विभागाच्या दिशानिर्देश व मानकाचे उलंघन करण्यात आले असुन मनमर्जी च्या अक्षरात नंबर प्लेट नोंदवून एक नवाच प्रकार घडवून आनला असल्याचे अंकीत नंबर प्लेट बघून निदर्शनास येत आहे*

*देव तारी त्यास कोण मारी*

*तसेही सावनेर नगरी ही पौराणिक सारस्वतपुर नगरी असुन ही नगरी “यमराज्यांची सासुरवाडी” म्हणून ओळखल्या जात असुन नगरीत अप्रिय घटनांन सोबतच मु्त्यूदर ही कमी आहे याचे मोठे उदाहरण म्हणजे “कोवीड़ 19” च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लाँकडाऊन मधे सुध्दा बोटावर मोजता येईल इतकाही मु्तकांचा आकडा़ नाही. तर मागील जवळपास तीन वर्षा पासुन नगरिच्या गल्ली बोळीत भरधाव धावनार्या बिन क्रमांकाच्या वाहनांमुळे कोणतीही जिवीत हानी होणार कशी*

*नागरिकांना आव्हान*

*नगरितील नगरवासीयाँना महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या माध्यमातून निवेदन करण्यात येते की आपण सावनेर क्षेत्रातील कोणत्याही प्रभागात नगर प्रशासनाव्दारे पुरविण्यात येत असलेल्या साफ सफाई, पेयजल आपुर्ती,पथदिवे व इतर सोइ सुविधा संबंधित समस्या असल्यास 9325243536 या क्रमांकावर सदर विषयाचे दोन ते तीन छायाचित्रे व सविस्तार पणे मजकूर पाठवावा जेणेकरून शहरातील जिवनावश्यक सेवा नागरिकांना योग्य वेळेत मीळाव्यात व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता महाराष्ट्र न्यूज मीडिया पुढाकार घेऊण आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तत्पर रहील*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …