Breaking News

*कामगारांना त्यांच्या गंतव्यावर पोहचविण्यासाठी प्रशासन सज्ज* *सावनेर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे पुढाकार* *वेळेवर विशेष ट्रेन रद्द झाल्यामुळे कामगारांना मनस्ताप*

*कामगारांना त्यांच्या गंतव्यावर पोहचविण्यासाठी प्रशासन सज्ज*

*सावनेर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे पुढाकार*

*वेळेवर विशेष ट्रेन रद्द झाल्यामुळे कामगारांना मनस्ताप*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*

*सावनेर – कोवीड़ 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाने घोषित केलेल्या लाँकडाऊन मुळे अनेक कामगार आपल्या कर्तव्यावर अथवा आहे त्या ठिकाणी अडकून राहीले.14 दिवसीय लाँकडाऊन च्या पहिल्या चरणात स्थिती सामान्य होईल असा सर्वसामान्यांचा समज होता परंतू पहिल्या चरणा पाठोपाठ दुसरा व सद्यस्थितीत सुरु असलेला तीसरा चरण त्यामुळे परप्रांतीय कामगारांच्या हाताला काम नाही, खायला अन्न नही,कांत्रटदार व कंपनी मालकांनी राहुट्या हलवील्या याऊपर आप्त परिवाराच्या आठवणी सतावू लागल्या परिवहनाचे साधन नाही अश्यात कामगारांनी पाईच आपल्या गावी जाण्याचा निर्धार घेतला यातच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागला व राज्यासह जिल्ह्यातील सीमा बंदी झाल्यामुळे कामगार जिथल्या तीथे अडकून राहीला*


*लाँकडाऊन च्या तिसर्या चरणात केन्द्र व राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मार्फत परप्रांतीय कामगारांच्या नोंदणी संकेत स्थळावरुण नोंदनी करुण त्याप्रमाणे ट्रेन व बसेस ची व्यवस्था करुण कामगारांना त्यांच्या गंतव्यावर पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले*

*ऐन वेळेवर ट्रेन रद्द झाल्याने परप्रांतीयांचे लवकर घरी जाण्याचे स्वप्न भांगले*

*दि.05 मार्च ला सावनेर उपविभातील सावनेर,मोहपा,खापा,खापरखेडा खुमारी आदि ठीकाणावरुन जवळपास शंभर कामगारांना शासकीय वाहनांने तहसील कार्यालय परिसरात आणन्यात येऊन महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या बसेस नी त्यांना नागपूर रेल्वे स्थानक व बस स्थानकावर नेऊन सोडण्याची योजना होती शासन आपणास आपल्या गावी पोहचून देत असल्याचा आनंद ही कामगारांच्या चेहर्यावर दिसून येत होता परंतु ऐनवेळी “माजर आडवी गेली” व मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी ठीकाणी जाणार्या ट्रेन अचानक काही कारणास्तव रद्द झाल्या व कामगारात निराशेचे वातावरण निर्माण झाले अश्यात सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे यांनी उपस्थित सर्व कामगारांची समजूत घालून त्यांना आणलेल्या ठिकाणी परत शासकीय वाहनांनी नेऊन पोहचवत मानूसकीचा परिचय देत काहघ तांत्रिक कारणामु ट्रेन रद्द झाल्याने त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली*


*केन्द्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार विशेष ट्रेन नी तालुक्यातील कामगारांना त्यांच्या गंतव्यावर पोहचविण्यासाठी नाझर जयसिंग राठोड,कनिष्ठ लिपिक अमोल देशपांडे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …