*दुर्गापूर परिसरात आढळला कोरोना रुग्ण*
विशेष प्रतिनिधि- मुजम्मील शेख
*चंद्रपूर – शहरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची बातमी काही वेळेपूर्वीच मिळाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असताना आता पुन्हा 1 नवीन रुग्ण कोरोना बाधित मिळाला असून जिल्ह्यातील पॉसिटीव्ह रुग्ण संख्या 3 वर पोहोचली आहे.*
*तिसरा कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण दुर्गापूर येथील 55 वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथून चंद्रपूर येथील दुर्गापूरला परिवारासहित आला होता, त्यावेळी त्याला कोरेन्टाईन करून नमुने घेतले असताना आज त्या तपासणी अहवालाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला.सध्या परिवारातील तिघांचे अहवाल येणे बाकी असल्याची खात्रीशीर माहिती आहे.*
*चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, पंचशील नगर या परिसरातील एक 55 वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिले आहे.*
*दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या दुर्गापुर परिसरात हैद्राबाद येथून 13 मे रोजी एक युवती चंद्रपूर येथे परत आली. या युवतीला इंस्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ( संस्थात्मक अलगीकरण ) करण्यात आले होते. मात्र ही युवती कुटुंबाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून 18 मे रोजी कुटुंबातील सहाही सदस्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. आज 6 पैकी 4 स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या चार अहवालात 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हैद्राबादवरून आलेली मुलगी, आई, अडीच वर्षाच्या छोट्या मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आहे.*
*या सहा पैकी आणखी दोन अहवाल प्रतीक्षेत आहे. 55 वर्षीय व्यक्तीमुळे आता चंद्रपूर येथे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज