Breaking News

*गडचिरोली धानोरा तालुक्यात नक्षल्यानी केली जाळपोळ* *नक्षल्यांनी ४ वाहने जाळली*

*गडचिरोली धानोरा तालुक्यात नक्षल्यानी केली जाळपोळ*


*नक्षल्यांनी ४ वाहने जाळली*

गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत कुलभट्टी व गजामेंढी गावाजवळ आज नक्षल्यांनी ३ टिप्पर व एका ट्रकची जाळपोळ केली. यावेळी नक्षल्यांनी रस्त्यावर झाडे आडवी टाकून व बॅनर बांधून रस्ता अडविला.

२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षली सृजनक्का ठार झाली होती. तिच्या मृत्यूच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. या बंददरम्यान नक्षल्यांनी चार वाहने जाळली आहेत. ही वाहने गडचिरोली येथील एका कंत्राटदाराची असून, ती रेती वाहतूक करण्याच्या कामावर होती. काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षली मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. सर्वप्रथम त्यांनी झाडे आडवी टाकून व बॅनर बांधून रस्ता अडविला. त्यानंतर समोरुन येणाऱ्या वाहनांचे चालक व त्यांच्या सहकाऱ्यांना अडविले.

सर्वांना परत पाठवून चारही वाहनांना आग लावली. रस्ता व बॅनरवर सृजनक्काला श्रद्धांजली वाहणारा मजकूर लिहून २२ मेपर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे फर्मान सोडले. नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली कमिटीने हे कृत्य केल्याचे त्यांच्या मजकुरावरुन दिसून येते. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …