Breaking News

*सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली आयोजित हरदोना खुर्द येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ३६ रक्तदातानी केले रक्तदान

*सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली आयोजित हरदोना खुर्द येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ३६
रक्तदातानी केले रक्तदान

विशेष प्रतिनिधी- गौतम धोटे

कोरपनाअंबुजा सिमेंट कंपनीच्या जवळच असलेल्या आयोजित हरदोना येथील नुकतेचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 36 रक्तदातानी रक्त दान केले .या कोरोना च्या संकटामुळे सर्व जग हादरून गेलं. महाराष्ट्रा मध्ये कोरोना च्या संकटाचे जाळे ओढावले गेले आहे. याकारणामुळे रक्तसाठा देखील कमी झाला. कोरोना या संसर्गजन्य आजाराने सर्वञ भितीचे वातावरण तयार झालेले असल्यामुळे रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशा परिस्थिति मध्ये रक्ताअभावी कुणाचा जिव जाऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले. या अवाहवानास प्रतिसाद देत स्व.सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपुर, येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे हरदोना खुर्द, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक २३/०५/२०२० वार शनिवार रोजी हनुमान मंदिर परिसर हरदोना खुर्द येथे श्री अक्षय टेकाम ( रा.से.यो.स्वयंसेवक) यांच्या पुढाकारातून व ग्रामपंचायत हरदोना खुर्द , युवा मित्र मंडळ हरदोना खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुभाष गिरडे व प्राध्यापक किरणकुमार मनुरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी , आजी माजी विद्यार्थी एस .आर .एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क व तसेच महाविद्यालयाचे इतर सर्व विद्यार्थी व हरदोना खुर्द येथील ग्रामस्थ तसेच श्री शंकर टेकाम (सरपंच ) हरदोना खुर्द तसेच उपसरपंच रामचंद्रजी सूर आणि सर्व युवक मित्र
व मानवतावादी रक्तवीर रक्तदाते यांच्या सहकार्याने संपन्न रक्तदान शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण होत आहे व अशा या परिस्थिति मध्ये आपण देशभक्त देशवासी म्हणुन देश सेवेसाठी रक्तदान करून इतरांना जिवनदान देऊ शकतो हि संकल्पना जोपासत यांनी रक्तदान केले.
तसेच गावातील रक्तदान करण्यासाठी आलेले युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण देश लोक डाऊन झाला असल्यामुळे लाकडाउनचे काटेकोर पालन करत, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशांमध्ये रक्ताचा तुटवडा कुठेही भासू नये व कुणाचेही रक्ताअभावी जिव जावु नये म्हणून हा एक सामाजिक उपक्रम पार पाडला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. निश्चितच कोरोना महामारीतून आपला देश लवकरच बाहेर पडेल अशा अपेक्षा व सदिच्छा आमच्या कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ सुनील साकुरे सर, उपप्राचार्य प्रा.नरेंद्र टिकले सर
यांनी यावेळी व्यक्त केल्या.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी समाजमाध्यमाव्दारे मार्गदर्शन व शुभेच्छेचा वर्षाव केला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …