Breaking News

*दहेगाव रेड झोन* *जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी दहेगाव ला भेट देऊण केली पाहनी* *स्थिती नियंत्रणात घाबरण्याचे कारण नाही*

*दहेगाव रेड झोन*

*जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी दहेगाव ला भेट देऊण केली पाहनी*

*स्थिती नियंत्रणात घाबरण्याचे कारण नाही*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया*

*सावनेरः तालुक्यातील दहेगाव रंगरी या गावतात दि.22 मे ला एक कोरोना पाँजेटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली व तातडीने त्याच्या संपर्कात येणाऱ्या एकूण 17 लोकांना आमदार निवास नागपूर येथील कोरंटाईन सेंटर ला हलवून दहेगाव येथील सरपंच प्रकाश गजभिये,ग्राम सचिव व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने वार्ड क्र 1व 2 चा काही भाग तात्काळ सील करुण त्या परिसरा सह गावात ही प्रवेश बंदी करण्यात आली आहे*


*कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या चवथ्या चरणातील लाँकडाऊन मधे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्राकारास तोंड देण्यास सज्ज असले तरी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. काल पर्यंत मोठ्या शहरात असलेल्या कोराना़ चा शिरकाव आता ग्रामीण भागात ही दिसून येत असल्याने नागरिकांना अधिक सावध रहावे लागणार असून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोर पणे पालन करणे हाच कोरोना संसर्गावर प्राथमीक उपचार असून सर्वांनी स्वतःची व परिवाराची काळजी घेण्याकरीता अनावश्यक प्रवास व गर्दीचे ठीकाण टाळावे अशी विनंती मा.रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपूर तसेच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी केली आहे*

*घाबरण्याचे कारण नाही*- प्रकाश गजभिये (सरपंच दहेगाव)

*दहेगाव येथील सरपंच प्रकाश गजभिये यांनी आमच्या प्रतिनिधीं बोलताना सांगितले की कोरोना पाँजेटिव्ह रुग्ण मीळालेले परिसर व त्या भागातील वार्ड क्र 1 व 2 पुर्णपणे सील करण्यात आला असुन गावात इतर नागरिकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 22 लोकांना नागपूर येथील आमदार निवास येथील कोरंटाईन सेंटर ला पाठविण्यात आले आहे.सोबतच संपूर्ण गावाची फवारणी वरच्या वर करण्यात येत असून मा.जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विस्तार अधिकारी,वरिष्ठ चिकित्सक आदींनी गावाला भेट देऊण स्थितीची पाहणी केली असुन वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेचे आम्ही पालन करत आहोत.सध्या स्थीती नियंत्रणात असुन आढळलेला रुग्ण हा कुणा कुणाच्या संपर्कात आला त्याचा आम्ही शोध घेत आहो व त्यांना ही कोरंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच दहेगावात आढळलेला रुग्ण मरण पावला अश्या अफवा पसरत असून अश्या अफवाँवर लक्ष देऊ नये रुग्णावर योग्य उपचार सुरु असल्याची माहिती देत ग्रामवासींयांनी या कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आप आपल्या घरीच राहून स्वताची काळजी घ्यावी अशी विनंती प्रसार माध्यमातून केली आहे*


*संपूर्ण स्थिती वर प्रशासनाची करडी नजर*
*सावनेर तहसील चे तहसीलदार दिपक कारंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की सावनेर तालुक्यातील स्थिती सामान्य व नियंत्रणात असून दहेगाव येथे आढळलेला रुग्ण व त्याच्या संपर्कातील लोकांना नागपूर येथे कोरंटाईन करण्यात आले असुन मा.जिल्हाधिकारी साहेब व उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दहेगाव सह संपूर्ण तालुक्यावर प्रशासनाची करडी नजर असुन वरच्या वर प्रत्येक ठीकाणावरुन अहवाल घेऊण तातडीची उपाययोजना आखण्यात येत आहे.नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगछ नये तसेच आपल्यु परिसरात बाहेरून आलेल्यांची सुचना आपल्या ग्राम सचिव, सरपंच,मुख्याधिकारी आदींना देऊण सहकार्य करावे अशी विनंती नागरिकांना केली आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …