Breaking News

*लोहारी सावंगा परिसरात लांडग्यांची दहशत* *गुरख्यावर तसेच मुलां वर हल्ला*

*लोहारी सावंगा परिसरात लांडग्यांची दहशत*


*गुरख्यावर तसेच मुलां वर हल्ला*

*विशेष प्रतिनिधी -अनिल बालपांडे*
*लैहारी सावंगाः सविस्तर वृत्त असे की गंगाधर सुरजुसे वय 55 वर्ष हा गुराखी हा नेहमी प्रमाणे सकाळी बकरी चारण्याकरिता गावालगत च्या नदीच्या कडेला गेला काही वेळाने त्याला तहान लागली असता तो बाजूला असलेल्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला असता मागून फिक्कट पिवळ्या रंगाचे बिबट्या सारखे जनावरणे हल्ला केला त्या हल्ल्यात त्या गरीब गुरख्या ला डोळ्या ला व चेहऱ्यावर गंभिर जखम झाली असून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे पाठविण्यात आले आहे तो जखमी झाला असून परिसरात नागरिकांमध्ये भीती चे वातावरण आहे*
*अश्याच प्रकारची घटना सायंकाळी जातलापुर येथील महेश हरिभाऊ माणेराव वय 22 वर्ष हया ला सुध्दा लांडगया सारखे दिसणाऱ्या जनावरणे जखमी केले त्याला सुद्धा प्राथमिक आरोग्य केन्द्र मेंढला येथे नेण्यात आले*
*वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता आम्ही पेट्रोलिंग करत असून त्याच्या मार्गा वर आहे असे सांगण्यात आले तसेच जखमींची चौकशी करून त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल असे सांगण्यात आले*
*वन्यप्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्यांचा उपचार सुरू असून जखमींना वन विभाग व शासनाने तात्काळ आर्थिक मदत तसेच सदर वन्यप्राण्यांच्या शोध लाऊन त्यास पकडून वन्य परिक्षेत्रात सोडवा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …