*गडचिरोली जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ रुग्णांची भर*

*एकूण रुग्णसंख्या 24*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली : आज एकाच दिवशी एटापल्ली व भामरागड तालुक्यांत तब्बल ९ नवे रुग्ण कोरोना विषाणू पॉझिटीव्ह आढळून आले असून, आता पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ झाली आहे.
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार, आणखी नऊ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे रुग्ण एटापल्ली व भामरागड तालुक्यातील असून, ते मुंबईहून आले होते. त्यांना एटापल्ली येथे संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते, त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.काल रात्री प्राप्त अहवालानुसार अहेरी तालुक्यात कोरोनाचे २ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर आज दुपारी एटापल्ली व भामरागड तालुक्यांतील ९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
१७ मे च्या रात्री प्राप्त झालेल्या अहवालात पहिल्यांदा कुरखेडा तालुक्यातील २ व चामोर्शी तालुक्यातील १ असे ३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढत चालली आहे.
*कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-* कुरखेडा-७, चामोर्शी-३, आरमोरी-२, कोरची-१, अहेरी-२, एटापल्ली व भामरागड ९ असून, आता पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 24 झाली आहे.
काल (ता.२४ )रात्री दहा वाजता प्राप्त अहवालानुसार, आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे रुग्ण अहेरी तालुक्यातील असून, ते मुंबईहून आले होते. त्यांना संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते, त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 24 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ही संख्या सातत्याने वाढत चालली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज