सलून दुकाने बंद असल्यामुळे घरीच एकमेका साह्य करू
मौदा: देशात असलेल्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे त्यामुळे सर्व ठिकाणी सलून दुकाने बंद आहे त्यामुळे सलून मध्ये जाऊन कटींग दाढी फेशियल करणाऱ्याची गोची झाली.आज दाढी करण्याचे साहित्य घरीच उपलब्ध असल्यामुळे अनेक पुरुष घरीच दाढी करतात परंतु कटींग साठी मात्र सलून मध्ये जावे लागते.लॉकडाऊन मुळे सलून बंद आहेत.ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी न्हावी मोठया व श्रीमंत लोकांचे घरी जाऊन कटींग करत असत. तीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे.आज सलूनचे व्यवसाय करणारे अनेक लोक ग्राहकाचे घरी जाऊन कटींग करीत आहेत. साधारणतः शंभर ते दोनशे रुपये कटींग दाढी चे घेतले जातात. काही लोकांनी घरीच ट्रीमर नावाचे चारशे ते पाचशे रुपयाचे यंत्र खरेदी करून केश कर्तन करणे सुरू केले आहे. या यंत्राचा वापर ज्यांनी कधी केला नाही त्यांची मात्र आफत होत असते. त्यामुळे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणी प्रमाणे एकमेकांची कटींग करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे.काहींनी तर आपला चमन गोटा (टक्कल) केला तर काहींनी आपली दाढी कटींग वाढवून आपले वेगळे सौन्दर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आली या भोगासी असावे सादर या उक्ती प्रमाणे आलेल्या संकटावर मात करून या ना त्या प्रकारे आपले सौन्दर्य टिकवून ठेवण्याचा प्रकार पुरुष मंडळी करत आहेत. सलून मध्ये केलेल्या कटींग ची सर जरी त्याला येत नसली तरी कटींग करण्याचे समाधान मात्र नक्की होत आहे.महिलांचे केश रचनालय मात्र बंद असल्यामुळे व महिलांच्या सैरांद्री घरी जाऊन सेवा देत नसल्यामुळे महिला वर्गात निराशेचे वातावरण आहे.
Maharashtra News Media सच की आवाज