Breaking News

*कै.राम गणेश गडकरी यांची जयंती साजरी* *मराठमोळ्या थोर नाटककारास विनम्र अभिवादन*

*कै.राम गणेश गडकरी यांची जयंती साजरी*
*मराठमोळ्या थोर नाटककारास विनम्र अभिवादन*

*प्रतिनिधी दिनेश चौरसीया*
*सावनेरः थोर साहित्यिक नाटककार व आपल्या अमुल्य लेखनी ने मराठी भाषेला सात समुद्र पार लौकिक करूण “शेक्सपिअर” च्या नावाने ओळखले जाणारे कै.राम गणेश गडकरी यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कै.राम गणेश गडकरी युवा मंचच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली*
*त्याच प्रमाणे गणेश वाचनालय, राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालय येथे ही भाषाप्रभू ला स्मरण करुण आदरांजली वाहण्यात आली*
*कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सोशल डिस्टंसींग व गर्दीचे ठीकाण टाळण्याच्या सुचनेचे पालन करुण सर्व गडकरी प्रेमींनी सकाळी 9-00 वाजता आपल्या घरीच कै.राम गणेश गडकरी यांचे स्मरण करुण आदरांजली वाहून कै.राम गणेश गडकरी जयंती साजरी केली*
*गणेश वाचनालय चे अँड् श्रीकांत पांडे,मुरलीधर पुरे व विश्वस्त, राम गणेश गडकरी महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे,प्रा.विजय टेकाडे,कै.राम गणेश गडकरी युवा मंच चे किशोर ढुंढेले, प्रथमेश,देशपांडे, आशिष लोधी,रवी काळबांडे, मयुरेश देशपांडे, दिनेश चौरसीया आदिंनी आप-आपल्या घरीच कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस उजाळा देत त्याची जयंती साजरी केली*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …