*जिल्हाधिकारींची सावनेर तहसील कार्यालयास भेट*

*वाढते कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावा सोबतच टोळघाट संकटावर उपाययोजनेचे दिशानिर्देश*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सावनेर तहसील कार्यालयात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढतख कोविड १९ चा प्रादुर्भाव व आकस्मिक आलेल्या टोळधाड किटकांच्या हल्याच्या अनुशंगाने बैठक घेऊण मार्गदर्शन करीत तातडीने उपाययोजना आखण्याच्या सुचना देत तालुक्यातील कोवीड़ 19 करिता करण्यात आलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला*

*सावनेर तहसील कार्यालय येथे मा. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दुपारी ३.१५ चे दरम्यान कोविड १९ चे संक्रमनाला कमी करण्याच्या अनुशंघाने बैठक घेतली. या बैठकीत उपविभागीय अधिकारी अतुल म्हैत्रे, पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक सरंभळकर, तहसीलदार दीपक कारंडे, पोलीस निरीक्षक सावनेर अशोक कोळी, खापा पो.स्टे चे ठाणेदार ऐकरे, मुख्याधिकारी रवीन्द्र भेलावे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भुषन सेंबेकर, डॉ. संदीप गजर,डॉ. सोनाली छेनिया आदी प्रमुख्याने उपस्थित होते.*

*याप्रसंगी त्यांनी कोविड १९ के संक्रमण कमी करण्याच्या अनुशंगाने उपाय योजनांवर चर्चा करत नुकत्याच ग्रामीण दहेगाव पाठोपाठ कळमेश्वर तालुक्यातील सोनोली कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रनेत तसेच सुरक्षात्मक उपाय योजनांवर विशेष चर्चा करूण उपस्थित अधिकाऱ्यांना विशेष सूचना देत.सांगितले की लवकरच पावसाळा लागत असुन पावसाला सुरवात होणार आहे व कोरोना वायरस ला दमट वातावरण पोषक ठरणार आहे. तेव्हा कश्या प्रकारे कंट्रोल करता येईल यावर त्यांनी जास्त भर दिला. यावेळी खाजगी दवाखान्यातही कोरोना विषाणू ग्रस्त रुगणांना उपचारा करिता नाकारता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. व अचानक टोळधाडीच्या रूपाने शेतकऱ्यांना एक नवीन संकटाला सामोरे जावे लागत असून त्यावर सुद्धा उपाय योजनांवर तालुका कृषि अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या*.
*सावनेर तहसील कार्यालयाच्या बैठकीला सम्बोधित करून सोनोली या गावाला भेट देण्या करिता रवाना झाले. यावेळी त्यांचे सोबत उपविभागीय अधिकारी अतुल म्हैत्रे व स्थानिक वैद्यकीय अधिकारी सोबत कळमेश्वर तालुक्यातील व सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनोली गावास भेट देऊण पाहणी करुण ग्राम पंचायत चे सरपंच बंडू वाघाडे ग्राम पंचायत सदस्य ग्रामसेवक, आशा वर्कर आदिंचे उत्साहवर्धन करुण या कठीण परिस्थितीत संपूर्ण प्रशासन आपल्या पाठीशी आहे याचा जनुकाही आभास करुण दीला*
Maharashtra News Media सच की आवाज