*डॉ. हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालयात “झुम बराबर झुम”प्रकरण भाग (2)* *अर्थ व राजकीय दबावाखाली प्रकरण गुलदस्त्यात तर जाणार नाही ना…?*

*डॉ. हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालयात “झुम बराबर झुम”प्रकरण भाग (2)*

*अर्थ व राजकीय दबावाखाली प्रकरण गुलदस्त्यात तर जाणार नाही ना…?*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः सर्व विदित आहे की राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ अंतर्गत व राष्ट्र विकास शिक्षण संस्था खापा व्दारे सावनेर शहरात 1965 पासून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना निरंतर शैक्षणिक सेवा देणारे संस्थान म्हणजे डॉ हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय सावनेर येथे काही दिवसापूर्वी स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी उघडकीस आणलेल्या प्राचार्य व त्यांच्या मीत्रांच्या “दारु व मटन” पार्टी प्रकरणामुळे पवीत्र विद्देचे मंदिर अश्या समझल्या जाणाऱ्या महाविद्यालयाचे पावित्र प्राचार्याच्या शौका पाई धोक्यात आले आहे*


*सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने दखल घेत एपीआय जुनोनकर यांनी आपल्या अधिनस्तांना सोबत घेत घटनास्थळी पोहचून घटनेची सत्यता उघडकीस आली.व सदर घटनेचा तपास सुरु होताच तक्रारकर्ते व इतरांवर मानधरनीच्या प्रकारस सुरवात झाल्याचे खात्रीलायक वुत्त असुन वेळीत “दे दान सुटे गीरान” चे ही प्रयत्न करण्यात आल्याचे सुत्र असुन सदर प्रकरण दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ व राजकीय दबावतंत्र वापरण्याचे प्रयत्न प्राचार्य व त्यांचे “हम प्याला हम निवाला” मित्रांन कडून सुरु असल्याच्या चर्चा शिक्षण क्षेत्रा सह आजी माजी विद्यार्थ्यांत जोमाने रंगत असुन सदर प्रकरणात थातुरमातुर चौकशी करुण विद्दे सारख्या पावन ठीकाणी ऐय्याशीच्या नावावर घडलेला प्रकार गुलदस्त्यात टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे खात्रीलायक वु्त्त आहे*


*विद्या दान कारणार्या या विद्यामंदिरात घडलेला हा लाजिरवाणा प्रकार “कोवीड़ 19” रोकथाम करण्यासाठी लागू असलेल्या सर्व नियमांचे उलंघन करुण इतरत्र कोठे घडला असता तर आतापर्यंत प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला असता परंतू सदर प्रकरणात तपास यंत्रणा दिरंगाई का करत आहे हे कळेनासे होत असल्याचे बोलले जात आहे*

*घटनास्थळी मिळालेल्या खालील आपत्तीजनक पुराव्यांची शहनिशा होने गरजेचे*

*1) सदर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्राचार्या सह इतर सहा सात मीत्र व जेवण दारू वाढणाऱ्यांचा सदर घटनेत उल्लेख असने गरजे आहे…?*

*2) सदर इसमं हे रेड झोन घोषित नागपूर शहरातील विविध भागातून आले असल्याचे सुत्र असुन त्यांना लाँकडाऊन च्या काळात सावनेर येण्याची परवानगी होती काय…?*

*3) रेड झोन नागपूर वरुण कोणत्या व कीती साधनाने सावनेर ला आले होते त्या संबंधित माहिती घेणे अपेक्षित नाही का…?*

*4)घटनास्थळी आढळलेल्या सर्व संशयीतांची “मदिरा पान” केल्या बद्दल ची खात्री पटवणारी वैधाकिय तपासणी प्राथमिक आरोग्य केन्द्रात करण्यात आली का…?*

*5) घटनास्थळी मिळालेल्या गंज,प्लेट व खाली पडलेले मास हे “बकरा,बकरी,शेळी,मेंढी,कोंबडा, कोंबडीचे अथवा प्रतिबंधक गौ मास अथवा अन्य वन्य प्राण्याचे तर नाही ना याची तपासणी करीता पाठविण्यात आले का…?*

*6) घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यावरून शैक्षणिक स्थानी व संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीशी झुंज देत असताना असे मासजन्य पदार्थ शिजविण्याची व आपल्या इष्ट मीत्रांना पार्टी देण्याची परवानगी आहे का…?*

*7)सदर घटना इतर ठिकाणी घडली असती तर त्यांनाही इतकीच मुभा उपलब्ध असती का…?*


*अश्या अनेक प्रकारामुळे सदर प्रकरण अधिकाधिक चर्चेचा विषय बनून गंभीर होत असल्याचे सुत्र आहे*

*सदर घटनेचा वेळीच योग्य तपास हैऊण घटनेतील सत्यता उघडकीस आणून दोषींवर योग कारवाई व्हावी अशी मागणी डॉ हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय सावनेर चे आजी माजी विद्यार्थ्यांनसह हितचिंतकांन कडून होत आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …