Breaking News

पक्षी मित्राकडून घुबडाला जीवदान

पक्षी मित्राकडून घुबडाला जीवदान

मौदा प्रतिनिधी – संजय गीरडे
मौदा–  मौदा तालुक्यातील लाप का येथील शेतकरी सरिता रामटेके यांच्या शेतातील विहरीत पाण्यात पडलेल्या एका घुबडाला मौदा येथील पक्षीमित्र पुरुषोत्तम बांगरे यांनी 30 फूट विहरीतून बाहेर काढले साधारणतः 2 किलो वजन असलेला घुबड विहरिवर पाणी भरण्याकरिता गेलेल्या महिलांना आढळुन आला पक्षी मित्र राजू भुरे अशोक अण्णा यांना माहिती मिळताच त्यानी पुरुषोत्तम बांगरे याना पाठवून घुबडाला विहरीतून बाहेर काढले विहरीचे निरीक्षण केले असता पाण्यापासून काही अंतरावर घुबड्याचे घरटे असल्याचे लक्षात आले व पुन्हा त्या घुबडाला त्याच्या घरट्यात सोडण्यात आले अशोक अण्णा यांनी दिलेल्या माहिती नुसार घुबड हा पक्षी रात्रीच्या वेळेला आपले भक्ष शोधण्यासाठी निघत असते विहरीच्या कडीकप्पारीत किंवा मोठ्या झाडाच्या ढोलीत यांचे वास्तव्य असते हा पक्षी दिवसा सहसा दिसत नाही या पक्षाविषयी आजही अनेक गैर समज आहेत

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …