*महादुला येथे तिघाजणांना कोरोणा ची लागण*
*महादुला परिसरात कोरोणाचा शिरकाव*
*कोराडी प्रतिनिधी दिलीप येवले*
*कामठी – तालुक्यातील नगर पंचायत महादुला अंतर्गत येथील बाजार चौक, रमाई नगर, महादुला येथे तिघांना कोणाची लागण झालेली आहे. शुक्रवारला बाजार चौक, रमाई नगर, महादुला येथे एका युवकाला कोरोना ची लागण झालेली होती. तो बिहार येथून आपल्या मालकीच्या चार चाकी गाडीने कामगारांना सोडण्याकरिता बिहारला गेलेला होता. बिहार वरून परत आपल्या राहत्या घरी बाजार चौक, रमाई नगर, महादूला येथे आला संपूर्ण परिवारासोबत त्यांनी काही दिवस दिवस घालवले नंतर त्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड आल्याने तो गुमथी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासणीसाठी गेलेला होता तेथील डॉक्टरांनी त्याला मेयो रूग्णालय नागपूर येथे तपासणीकरिता पाठविले त्याचा रिपोर्ट पाँझिटिव आल्याने महादुला परिसरात खळबळ उडाली होती. त्याच्या कुटुंबातल्या तिघाजणांना आई, वडील व पत्नी या तिघांना कोरोना ची लागण झालेली असून पुन्हा महादुला येथे खळबळ माजली आहे. बाजार चौक, रमाई नगर महादुला परिसर नगरपंचायत तर्फ सील करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसर सुद्धा करण्यात सँनिटायझर करण्यात आलेला होता.
दिवसेनदिवस महादुला येते कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असून महादुला व आजूबाजूच्या परिसरात चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे तसेच नागरिक नागरिकांमध्ये भय निर्माण झालेला आहे महादुला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आतापर्यंत परिसरातील आजूबाजूच्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले होते रेड झोन मध्ये महादुला आलेला असून अजून किती लोकांना कोरोणा ची लागण झालेली आहे याची दखल प्रशासन घेत आहे पुढील कामाला प्रशासन सज्ज झालेली आहे.