*चंद्रपूर महाऔष्णिक विद्दुत केंद्रात मोठा अपघात* *चार कामगार गंभीर* *दोषियांवर कारवाई करण्याची मागणी.*

*चंद्रपूर महाऔष्णिक विद्दुत केंद्रात मोठा अपघात*

*चार कामगार गंभीर*

*दोषियांवर कारवाई करण्याची मागणी.*

विशेष प्रतिनिधि -मुजम्मील शेख
*चंद्रपूरमहाऔष्णिक विद्युत केंद्रात आज जवळपास 12.00 च्या दरम्यान यूनिट क्रमांक 6 मधे बॉयलर चे काम करीत असतांना कंत्राटदार यांचे कामगार कर्मचारी चढता चढता पडल्याने भाजून गंभीर जखमी झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.*
*यापैकी एका कामगाराला डॉ. मेहता यांच्या रूग्णालयात तर उर्वरित तीन कामगारांना गाडेगोणे यांच्या रूग्णालयात भरती करण्यात आले असून एकाची प्रक्रुती अतिशय गंभीर असल्याची माहीती आहे.*
*चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात मागील अनेक वर्षापासून ठेकेदारी करणार्या  कंत्राटदारांना क्लिनिंगचे तांत्रिक कामे करण्याचा ठेका आहे. मात्र सेफ्टीच्या बाबतीत कंत्राटदार यांनी कुठल्याच उपाययोजना केल्या नसल्याने आता या अपघाताने सिद्ध झाले आहे. सोबतच या विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे सुद्धा या सेफ्टी कडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. आता या अपघाताचे खापर कुणावर फोडल्या जाईल याबाबत स्पष्ट नसले तरी कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता हे खरे कामगारांच्या अपघाताला दोषी असल्याची चर्चा आहे.असे कामगारन कडून बोलल्या जात आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …