*डाकीया डाक लाया येणार सुरक्षा कीट घालून*
*इतिहासात नोंद व्हावी असेच “डाकीया “चे कार्य – देवराव भोंगळे*
*चंद्रपुरातील पोस्टमन समुहाला आ. सुधीर मुनगंटीवार यांचे तर्फे सुरक्षा किट वितरीत*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
चंद्रपूर :-किमान दीडशे-दोनशे वर्षापूर्वी पोस्टखाते अस्तित्वात आले.कालांतराने अशा समकक्ष संस्था निर्माण झाल्या,पण सगळी आव्हाने स्वीकारून हे खाते जीवंत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडच्या काळात विविध उपाययोजना केल्या.त्यामुळे पोस्ट खात्याला नवसंजीवनी मिळाली,त्यामुळे कात टाकत पोस्ट खाते नव्या रुपात लोकांच्या सेवेत अग्रेसर आहे.कोविड १९ च्या संकटात सुट्टी न घेता पोस्टमन सेवा देत आहे.ते अतुलनीय व प्रशंसनीय आहे.पोस्टमन आपले कर्तव्य बजावत असून हीच खरी देशसेवा आहे.बालपणी “डाकीया डाक लाया” हे गाणे आपण ऐकले आहे. या डाकीयाची नोंद इतिहासात व्हावी,असेच त्यांचे कार्य आहे,असे प्रतिपादन भाजपा महामंत्री,माजी जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपुर तर्फे आयोजित “पोस्टमन सुरक्षा किट”वितरण ” उपक्रमा प्रसंगी,अध्यक्ष म्हणून मुख्य पोस्ट कार्यालयात बुधवार (३ जून) ला बोलत होते.यावेळी माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांचे वतीने पोस्टमन सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर राहुल पावडे,नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,प्रकाश धारणे,डॉ मंगेश गुलवाडे,प्रवर अधीक्षक ए एन सुशिर,सह. अधीक्षक ए के बनसोड, प्रवर डाकपाल ए के भासारकर,सूरज पेदुलवार,प्रज्वलंत कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
देवराव भोंगळे पुढे म्हणाले,कोरोना संकटाचा सामना कसा करायचा याची सविस्तर माहिती, लोकांना नसताना शासनाच्या पाहिले,विकासपुरुष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मदतकार्य सुरू केले.या सोबतच त्यांनी कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी नियोजन केले.त्याचा परिपाक म्हणून पोस्टमनला सुरक्षा किट दिली जात आहे.यात सॅनिटायझर,मास्क,साबण, पांढरा पंचा व बिस्कीटचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुभाष कासंगोट्टूवार,डाक अधिकारी ए एन सुशिर,ए के भसारकर,ए के बनसोड यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन करीत सह.डाकपाल टी के खोब्रागडे यांनी कोरोना संकटातील पोस्टमन व पोस्ट खाते करीत असलेल्या कार्याची माहिती करून दिली.प्रास्ताविकात प्रशांत विघ्नेश्वर यांनी पोस्टमन सुरक्षा किट बाबतचा आ.सुधीर मुनगंटीवार यांचा उद्देश स्पष्ट केला.पोस्टमन राजु मत्ते,गणेश कोठारे यांनी आभार मानले.विशेष म्हणजे यावेळी डाक अधिकारी भासारकर व खोब्रागडे यांनी मान्यवरांचे बँक व्यवहार खाते अवघ्या काही मिनिटात उघडून सुरू करून दिले,या खात्यावरून डिजिटल आर्थिक व्यवहार करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले.
Maharashtra News Media सच की आवाज