*जेवणाच्या वादातून ट्रक चालकाची हत्या करण्याऱ्या क्लीनर ला अटक*
*पाटणसावंगी सदभावना येथील घटना*
*सावनेर मधील एक महिन्यातील ही तिसरी घटना*
*विशेष प्रतिनिधी पाटणसावंगी*
*सावनेरः जेवणाच्या वादातून ट्रक चालकाचा क्लीनर ने खून केल्याची घटना मंगळवार सकाळी 6 वाजता च्या दरम्यान पाटणसावंगी येथील सदभावना नगर जवळ ही घटना उघडीस आली,*
*मु्तक चालक उदयनारायण मनोहर यादव, वय 36 ,रा. नागरिया , डाहानपूर,उत्तर प्रदेश, त्याच्याच ट्रॅक वरील आरोपी क्लीनर छोटू शिवनाथ प्रजापती वय 20 ,रा. नागरिया,जहाँपीर, आजम गढ,उत्तर प्रदेश अटक करण्यात आली आहे.*
*मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक जी.जे.१२ बी.टी.३२०६ आजमगड येथून चेन्नई येथे केबल ड्रम घेऊन जात असताना महामार्गावरील सदभावना पाटणसावंगी येथील सर्व्हिस रोडवर सोमवारी जेवण करण्याकरिता थांबले असता, चालक व क्लिनर याच्या मध्ये शाब्दिक वाद झाल्याने क्लीनर ने चालकाच्या डोक्यावर गाडीच्या केबिन मध्ये ठेवलेला लोखंडी पाण्याने मृतकाच्या डोक्यावर वार करून त्यास गाडी खाली ढकलून ठार केले. व आरोपी फरार झाला.मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान सदभावना समोर असलेल्या धाब्यावरील रेखा पृथ्वीराज कश्यप रा.पाटणसावंगी या महिलेला मृतक ट्रक च्या बाजूला पडलेला दिसला तिने स्थानिक पोलीस चौकी ला माहिती दिली असता रात्री ला आरोपी हा धाब्यावर आल्याची माहिती दिली.*
*सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीचा छडा़ लावून पाटणसावंगी टोल नाक्या जवळ पकडून अटक करण्यात आली*
*आरोपी विरुद्ध कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस सहाय्यक निरीक्षक निशांत फुलेकर ,संदीप नागरे, हेमराज कोल्हे पुढील तपास करत आहे.*