*बिना संगम येथील शेतातून बैल चोरी करणारे पोलिसांच्या जाळ्यात*
*दोन आरोपींना अटक*
*स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई*
खापरखेडा –स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त करित असतांना पोलिस स्टेशन खापरखेडा हद्दीतील वारेगाव शिवारात एका चारचाकी वाहन संशयास्पद रितीने दिसून आल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पाठलाग करुन त्या वाहनास कलमना हद्दीत ताब्यात घेतले असता वाहनात बिनानासंगम येथील एका कास्तकाराच्या शेतातून तीन पांढरा रंगाचे बैल चोरुन नेत असल्याचे शनिवारी रात्री एकच्या दरम्यान उघडकीस आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे 1) शेख़ इब्राहिम उर्फ इब्बू शेख़ इस्माइल, वय 35 वर्ष, रा. आजरी-माजरी, पार्वती नगर, नागपूर. 2) मुस्तफा इरा अन्सारी, वय 21 वर्ष, रा. फारूख नगर, टेकानाका, नागपुर यांना ताब्यात घेऊन १ पांढ़रा रंगाची TATA SUPER ACE गाडी क्रमांक MH 49 B 5969 किमत ३ लक्ष रु., दोन दुचाकी वाहने किमत 80 हजार रु. , तीन पांढरा रंगाचे शेती उपयोगी बैल किमत 80 हजार रु.असा एकूण 4 लक्ष साठ हजार रु.(४,६०,०००) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीवर पोलिस स्टेशन खापरखेडा येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीना पुढिल कायदेशीर कार्यवाही करिता खापरखेडा पोलिस स्टेशनच्या सर्वाधिक करण्यात आले .
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल जिट्टावार यांचे आदेशाने सहाय्यक फौज. लक्ष्मिप्रसाद दुबे, हेकॉ सुरज परमार, नीलेश बर्वे,नापोशि शैलेश यादव, पोशि प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड व साहेबराव बहाळे यांचे पथकाने केली.