*खापरखेडा पोलिसांनी अवैध रेती वाहतूकीचा ट्रक पकडला
खापरखेडा*
विशेष प्रतिनिधि
खापरखेडा – पोलिस ठाणे अंतर्गत दहेगाव रंगारी शिवारात अवैध रेतीची वाहतूक करताना पोलिसांना गश्तीदरम्यान आढळून आले.दरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन ट्रक जप्त करण्यात आला.
पर्यावरण माहितीनुसार खापरखेडा पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार उमेश ठाकरे, पोलिस नायक सुरेंद्र ठाकरे, पोलिस शिपाई भावेश शेंडे, स्वप्निल बोंडे हे पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खब-याद्वारे गुप्त माहितीच्या आधारे दहेगाव रंगारी शिवारात अवैध रेती चोरी होत असल्या बाबत मिळालेल्या माहितीवरून पोलिस गेले असता एक अज्ञात ट्रक क्र. MH 40 N 611 हा महामार्गावर येताना दिसला त्यास थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव रामभाऊ अजाबराव मेश्राम, रा. कोराडी असे सांगितले. सदर
आरोपी च्या ताब्यातून 02 ब्रास रेती ज्याची किंमत 4000 रू आणि एक ट्रक किंमत 3 लाख रु.असा एकूण 3,04,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी ला अटक करून सूचना पत्रावर सोडण्यात आले असून गुन्हा क्र. 374/20, कलम 379, 109, भा. द. वी. अन्वये नोंद करण्यात आला.ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास उमेश ठाकरे करीत आहेत..
Maharashtra News Media सच की आवाज