Breaking News

*रक्तदानासारखे पुण्य कार्य कोणतेच नाही* *खासदार बाळू धानोरकर यांचे वणीतील शिबिरात प्रतिपादन*

*रक्तदानासारखे पुण्य कार्य कोणतेच नाही*

*खासदार बाळू धानोरकर यांचे वणीतील शिबिरात प्रतिपादन*

विशेष प्रतिनिधि- मूजम्मिल शेख

 

वणी : कोवीड-१९ च्या संसर्गामुळे देशभरातील रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची गरज बघता शासनानेही रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संघटना रक्तदानासाठी पुढे येत आहेत. रक्तदान केल्याने एखाद्याचा जीव वाचतो. रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तदानासारखे पुण्य कार्य कोणतेच नाही, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.


वणी शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत युवा मित्र मंचाच्या वतीने आणि खासदार बाळु धानोरकर यांच्या पुढाकारातून रविवारी (ता. ७) धनोजे कुणबी समाज भवनात रक्तदान शिबिर पार पडले. त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक, केतन मांडवकर,भास्कर गोरे, पलाश बोढे, मनसेचे राजू उंबरकर, संजय देरकर, वसंत सिंग, धनंजय खाडे, ईश्वर खाडे, नितीन वैद्य, संध्या रामगिरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिरात प्रारंभी खासदार बाळू धानोरकर यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. रक्तदानाने केवळ गरजू रुग्णच नव्हे तर जो रक्तदाता असतो त्यालादेखील आरोग्यविषयक अनेक फायदे होतात. रक्तदानाने अनेक संभाव्य गंभीर आजार टाळल्या जातात. रक्तदानाचे मोठे महत्त्व आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी रक्ताचे उत्पादन होऊ शकले नाही. रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नाही. सुदृढ व्यक्ती दर तीन महिन्यांच्या अंतराने रक्तदान करु शकतो. १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींना रक्तदान मोहीम मोठ्या प्रमाणात राबवून रक्तसाठा वाढविण्यास मदत केली पाहिजे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा मित्र मंचाचे पदाधिकारी दीपक रासेकर, शुभम पिंपळकर, शुभम गोरे, गीतेश वैद्य, अनिकेत चामाटे, शुभम इंगळे यांनी आयोजनाकरिता सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …