Breaking News

*२ रुग्ण कोरोनामुक्त; गडचिरोली शहरातील तिघांचे नमुने निगेटीव्ह*

 

*२ रुग्ण कोरोनामुक्त; गडचिरोली शहरातील तिघांचे नमुने निगेटीव्ह*

गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

गडचिरोली: आरमोरी येथील शिवणी खुर्द येथील पती व पत्नी कोरोना पॉझिटीव आढळले, तर आज धानोरा तालुक्यातील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले.

रात्री शिवणीखुर्द येथील संस्थात्मक विलगीकरणात असलेले दाम्पत्य कोरोना पॉझिटीव आढळले, तर आज दोन कोविड-१९ बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. बरे झालेले रुग्ण धानोरा तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४३ एवढी आहे. आज दोनजण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्हयातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७ झाली आहे, तर सद्या १५ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यापूर्वी एक जणाचा हैद्राबाद येथे मृत्यू झाला आहे.

*‘त्या’ तिघांचे नमुने निगेटीव*

२७ मे रोजी मुंबईहून ५ प्रवासी गडचिरोलीत आले. त्यापैकी ४ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यात एकाच कुटुंबातील तीन, तर दोन वेगवेगळ्या कुटुंबातील प्रवाशांचा समावेश होता. पहिल्या तीनपैकी पती-पत्नी असे दोघे जण कोरोना पॉझिटीव आढळून आले होते. परंतु तिसऱ्या सदस्याचा अहवाल निगेटीव आला आहे. तसेच इतर दोन प्रवाशांचाही अहवाल निगेटीव आला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून तिन्ही निगेटीव प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातच ठेवण्यात आले आहे. त्यातच पॉझिटीव आढळलेला रूग्ण ठेवण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरणातील ५१ लोकांचे अहवालदेखील निगेटीव आले आहेत. शिवाय त्या महिलेच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या १७ व मध्यम जोखमीच्या १६ लोकांपैकी ३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीनही अहवाल सद्या निगेटीव मिळाले आहेत, तर उर्वरीत नमुने घेणे सुरू आहे.

सर्वांत महत्वाचे म्हणजे, गडचिरोली शहरातील ते दाम्पत्य मुंबई येथेच कोरोना बाधित झाले आहे. सद्या त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्या दोघांबरोबर प्रवास केलेले इतर तिघे निगेटीव आल्याने त्यांच्याकडून इतरांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका नाही. तरीही उर्वरीत तीव्र जोखमीच्या इतर लोकांचे सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करता येईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …