*पोलीस आयुक्तांकडून सूचना* *सावधगिरी बाळगण्याचे आवाहन*

*पोलीस आयुक्तांकडून सूचना*

*सावधगिरी बाळगण्याचे आवाहन*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

नागपुर/मुुंबईदि.८/६/२०२० पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास फार काळजी घ्यावी लागणार आहे. या कालावधीत बर्‍याच जणांनी धंदा / नोकरी गमावल्यामुळे‌ व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे, काही विक्षिप्त लोकांकडून गुन्हे घडण्याची‌ शक्यता आहे.

कारण या पुढे खालील प्रकार घडू शकतात.

👉घराबाहेर रहदारीच्या नियमांचे पालन करण्यात, *आपण स्वतःची व आपल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात कृतीशील असणे* आवश्यक आहे.

👉आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

👉 महागडी घड्याळे घालू नका. चैन साखळ्या, घरातील महिलाना सोन्याचे कानातले बांगड्या घालू नका.

👉 आपल्या हाताच्या पिशव्यांबाबत सावधगिरी बाळगा.

👉 आपल्या *मोबाईल‌ / फोनचा जास्त उपयोग* गर्दीत लोकांमध्ये करु नका. सार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

👉आवश्यक पैशा॑पेक्षा *जास्त पैसे* कॅश जव़ळ ठेऊ नका.

👉आपण बाहेर‌ जात असताना आपले *क्रेडिट आणि डेबिट कार्ड* सुरक्षित ठेवा.

👉आपले वडीलधारी, पत्नी आणि मुले सुरक्षित आहेत की नाही हे पहाण्यासाठी, *वेळीच कॉल* करा.

👉घराच्या लोकांना सूचना द्या की दरवाजा ऊघडताना, *मुख्य दरवाजापासून एक सुरक्षित अंतर ठेवा.* शक्य असल्यास ग्रील गेट्स, ग्रिलच्या जवळ जाऊ नका.

👉मुलांना वेळोवेळी *शक्य तितक्या लवकर* घरी परत जाण्याची सूचना द्या.

👉घरी पोहोचण्यासाठी निर्जन किंवा *शॉर्ट कट रस्ते* घेऊ नका. जास्तीत जास्त मुख्य रस्ते वापरा.

👉जेव्हा आपण बाहेर असाल तेव्हा आपल्या *आसपासच्या हालचालींवर लक्ष* ठेवा. मोबाईलवर गुंतू नका.

👉नेहमी आपत्कालीन *मदत क्रमांक* जवळ हाताला ठेवा.

👉लोकांपासून जास्तीत जास्त *सुरक्षित अंतर* ठेवा.

👉सगळेच जण‌ बहुधा *मुखवटा परिधान* करणारे असतील‌ त्यामुळे गुन्हेगार ओळखणे कठीण जाईल.

👉जे कॅब टॅक्सी सेवा वापरतात, त्यांनी प्रवासाचा तपशील आपले पालक, भावंड, नातेवाईक मित्र किंवा संरक्षकांसह सामायिक करा. प्रत्येक वेळी कॅब क्रमांक त्यांना मेसेज करा.

👉कमीत कमी रोख व्यवहार करा आणि सुटे पैसे जवळ ठेवा.

👉आवश्यकता नसल्यास खरेदी करू नका.

👉मोठे व्यवहार शक्यतो एकट्याने करू नका. वाद करु नका.

👉वाहनांमध्ये लॉक मध्ये *कोणतीही मौल्यवान वस्तू* सोडू नका. काचा फोडल्या जाऊ शकतात.

👉विनाकारण बाहेर भटकू नका.

👉पुढील काही महिन्यांपर्यंत किंवा एकंदरीत *परिस्थिती सुधारण्यापर्यंत याचे पालन करावे लागेल.*

*सावध रहा,सुरक्षित रहा*

*महाराष्ट्र पोलिसां तर्फे सार्वजनिक हितासाठी प्रसारीत…*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …