बानोर येथे ग्रँस्टोस्टो मुळे एकाचा मुत्यू

विशेष प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे
नरखेड – तालुकयातील बानोर -पिठोरी गावात दूषित पाणी पुरवठा मुळे जी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थिती मुळे मोठ्या प्रमाणात ग्रँस्टोची लागण झाली.असून त्यात एक जण दगावलेचे सांगण्यात आले .पांडुरंग सहारे असे त्याचे नाव आहे.ही घटना पाईपलाईन फुटलेली असल्याने दुषित पाण्यामुळे बानोर येथे ग्रँस्टोची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.या पाईपलाईनचे तातळीने दुरुस्ती करण्यातसाठी सलील देशमुख यांनी निदेश दिले.व ग्रँस्टोमुळे मरण पावलेल्या पांडुरंग सहारे यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णाबदल विचारपूस केली.

या परिस्थिती वर झालेल्या उपाय योजना व सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती यांनी आढावा घेतला. समंधीताना निर्देश दिले. यावेळी उपस्थित श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. किटे उपकार्यकारी अधिकारी स्वच्छाता व गुणवत्ता विभाग जिल्हा परिषद नागपूर, तालुका आरोग्य अधिकारी विघानंद गायकवाड. जिल्हा हिवताप अधिकारी, प्रशांत मोहोड खंडविकास अधिकारी, . स्वच्छता विभाग नरखेड, सौ. घाटोड पर्यवेक्षक, श्री. रामूजी कुंभरे सरपंच, उपसरपंच, श्री. पोलीस पाटील, सदस्य, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर, सचिव, व सर्व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.यांनी वरील परिस्थिती ची पाहनी केली.

Maharashtra News Media सच की आवाज