*सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय करण्याची परवानगी द्या*
*अन्यथा नाभिक व्यवसायीकांचा आंदोलन*
उपजिल्हा प्रतिनिधी-तुकाराम लुटे
मौदा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने एक आदेश काढून इतर व्यवसाय प्रमाणे सलून व ब्युटीपार्लर दुकान दि.२३ मार्च २०२० पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान सलुन व्यवसायिकांनी शासनादेशाचे पालन करत व्यवसाय पूर्णतः बंद ठेवले. यामुळे सलून व ब्युटीपार्लर व्यवसायिकांना उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत शासनास वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेऊन सलून व्यवसायिकांना कुठली मदत केली नाही.
आता आपण महाराष्ट्रात सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु सलून व ब्युटी पार्लर सुरू करण्याची परवानगी दिली नाही. तामिळनाडू, दिल्ली व मध्य प्रदेश यासारख्या राज्यांनी सलुन व्यवसायिकांना नियमांसह परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर आपणही अशा प्रकारे नियमावली घालून परवानगी द्यावी. अशा मागणीचे निवेदन मौदा तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि.९ जुन रोजी दिले आहे.
प्रामुख्याने मागण्या:
दि १० जुन पर्यंत सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या.
किंवा दर महा पंधरा हजार रुपये प्रत्येक सलून व्यवसाय दुकान मालक व कारागीर यांना द्यावे.
तसे न झाल्यास दि.११ जून २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजताच्या दरम्यान लोकशाही मार्गाने मुक आंदोलनाची करण्याचा इशारा नाभिक एकता मंचचे तालुकाध्यक्ष संदिप सुर्यवंशी, नरेंद्र चन्ने, शेखर मेश्राम, विश्वास येस्कर, अरविंद चावके, रवि सुर्यवंशी, नामदेव पारधी, महादेव उंबरकर, दादाराव पगाडे, संतोष अणकर, शशिकांत अणकर, अविनाश चन्ने, आदि सर्व नाभीक समाज बांधव उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज