*एसआयटी कडून चौकशीकरून कंत्राटदारावर कार्यवाही ची मागणी.*

*उर्जामंत्री डॉ नितीन राउत यांनी दीले चौकशीचे आदेश*
*तालुका प्रतिनिधी कामठी*
कामठी – शहराच्या विविध भागात मागील दोन वर्षात २० कोटी रुपयांचे हायमास्ट दिवे लावण्यात आले मात्र कंत्राटदारांनी हे काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून अर्धवट कामे केली असून विद्युत धक्क्याने जीव हानी होण्याची शक्यता बळावली आहे त्याकरिता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन सादर करीत संबंधित विषयावर चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली त्यावर राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.*
*सविस्तर असे की कामठी शहराची कोणत्याही प्रकारचा विकास आराखडा नगर परिषदेकडे तयार नसून विविध योजनांची कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. शहरात मागील दोन वर्षांपासून भूमिगत वीज पुरवठ्याची तारे घालण्यात आली व शहराच्या काही भागात विद्युत खांबावर महाऊर्जा कंपनी द्वारे एलईडी स्ट्रीट लाईट लावण्यात आले या लाईट सुरू करन्याकरिता वीज तारेची जोडणी करण्यात आली होती. कंत्राटदाराने वीज जोडणी करताना कित्तेक ठिकाणी खड्डे खोदून विजेच्या तारा खुल्या सोडल्या आहेत. त्या खड्ड्यात आता पावसाचे पाणी जमा होत असल्याने शॉर्ट सर्किटमुळे नागरिकांच्या जीवांना धोका निर्माण झाला आहे.*
*यातीलच एक भाग म्हणजे हायमास्ट लाईट होय या हायमास्ट लाईट लावताना शासनाने काढलेल्या निविदे प्रमाणे काम करण्यात आले नसून या कामात करारनाम्यात दर्शविले साहित्य सखी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, रमेश इलेक्ट्रिकल्स यांनी वापरलेले नसून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर करून भ्रष्टचार झाले असल्याचा आरोप करीत एसआयटी ची समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी करण्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश भोयर यांनी राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत याना दिले असता राऊत यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज