काटोलचे माजी आमदार तसेच म्हाडा चे सभापती सुनील शामराव शिंदे यांचे निधन
*गोरगरीब,शेतकरी बांधव तसेच जनसामान्यांचा समस्यांना प्रखतेने मांडून न्याय मीळवून देणारे महामेरूच्या आकस्मिक निधन झाल्यांने सामाजिक व राजनैतिक क्षेत्रातील न भरुन निघनारी क्षती झाली असुन महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली*
मौदा प्रतिनिधी – तुकाराम लुटे
मौदा : काटोल विधानसभेचे माजी आमदार तसेच म्हाडा चे सभापती सुनील शामराव शिंदे (८६) यांचा आज दि. ११ जुन २०२० रोजी सकाळी काटोल येथे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. सन१९८५ ते १९९५ या काळात दहा वर्षे त्यांनी काटोल विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे आमदार व त्या नंतर म्हाडाचे सभापती पद सुद्धा त्यांनी भूषविले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.
शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. शेतकऱ्यांच्या संत्र्याला भाव मिळावा याकरिता अनेकदा रस्त्यावर व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आंदोलने केली. सन १९९० च्या काळात शिंदे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी काटोल-नरखेड तालुक्यात शिक्षणाची क्रांती घडविली.
शोकसंवेदना :
आदरणीय शरद पवार साहेबांचे जवळचे सहकारी माजी आमदार सुनिल शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने नेहमी मार्गदर्शन करणारे एक ज्येष्ठ व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. शिंदे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शिवराज बाबा गुजर
जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर ग्रा.
Maharashtra News Media सच की आवाज