Breaking News

मोहाळी, बोरगाव,‌ चिरव्हा शिवारात टोळधाळ चा धुमाकूळ कृषी सभापती- तापेश्वर वैद्य यांचा पुढाकार

मोहाळी, बोरगाव,‌ चिरव्हा शिवारात टोळधाळ चा धुमाकूळ

कृषी सभापती- तापेश्वर वैद्य यांचा पुढाकार

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : गेल्या आठवडाभरात मौदा तालुक्यातील अनेक गावांत टोळधाळीने धुमाकूळ घातला आहे. आधी चाचेर, अरोली, निमखेडा, रेवराल, खापरखेडा या गावात थैमान घातला होता. तेथील बंदोबस्त होताच दि. १० जुन रोजी सायंकाळच्या पासून तालुक्यातील मोहाळी, बोरगाव, चिरव्हा शिवारामध्ये मुक्काम ठोकला आहे.

जिल्हा परिषद नागपूर चे कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, माहिती कळताच तालुका कृषी अधिकारी रविकांत वासनीक, तालुक्यातील कृषी सहायक यांना पाचारण करून टोळधाडी चा मागोवा घेऊन टोळधाड च्या निर्मुलनासाठी तालुका व जिल्हा प्रशासन सज्ज असुन फायरब्रिगेड, द्रोण, व ट्रक्टरच्या सहाय्याने फवारणी करण्यात आली.

तसेच जिल्हा परिषद नागपूर चे कृषी पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, यांच्या पुढाकाराने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शैडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी देशमुख, तहसिलदार प्रशांत सांगळे आदि परिस्थिती वर लक्ष देवून आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …